Virat Kohli Ban Pudhari
स्पोर्ट्स

Virat Kohli Ban: विराट कोहलीवर बंदी घातली जाणार? मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यामुळे खळबळ; काय आहे BCCIचा नियम?

Virat Kohli IPL Controversy: मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात Virat Kohli आऊट झाल्यानंतर रागात हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकल्याने वाद निर्माण झाला.

पुढारी वृत्तसेवा

Virat Kohli IPL Controversy: IPL 2026 मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या खेळामुळे नाही, तर त्याच्या रागामुळे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात RCB ने 18 धावांनी विजय मिळवला. कोहलीने 38 चेंडूत 50 धावांची महत्त्वाची खेळी केली. पण खरा ड्रामा तो आऊट झाल्यानंतर सुरू झाला.

नेमकं काय घडलं?

कोहली आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रूमकडे जात होता. तेवढ्यात त्याचा राग अनावर झाला. बाउंड्री लाइन ओलांडताना त्याने जोरात ग्लोव्हज आणि हेल्मेट फेकून दिलं. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला. इथूनच वादाला सुरुवात झाली.

बॅन लागणार का? नियम काय सांगतात?

हा प्रकार Board of Control for Cricket in India च्या IPL कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन मानलं जातं. अनुच्छेद 2.2 नुसार मैदानावर उपकरणांचा गैरवापर करणे हा Level-1 offence मानला जातो. यामध्ये:

  • बॅट, हेल्मेट, ग्लोव्हज फेकणे

  • स्टंपला लाथ मारणे

  • मैदानावरील वस्तूंचे नुकसान करणे हे सर्व येतं.

शिक्षा काय होऊ शकते?

Level-1 offence असल्यामुळे कोहलीवर बॅन लागण्याची शक्यता कमी आहे, पण 10% ते 25% मॅच फी दंड आणि 1 डिमेरिट पॉइंट लावला जाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो. पण या सगळ्या वादात. कोहलीने एक विक्रमही केला आहे.

वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी गोष्ट दुर्लक्षित झाली ती म्हणजे कोहलीने एक ऐतिहासिक विक्रम केला. तो Mumbai Indians विरुद्ध T20 मध्ये 1000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने केएल राहुल (977) आणि शिखर धवन (901) यांना मागे टाकलं. आतापर्यंत त्याने 37 सामन्यात 1030 धावा केल्या आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT