Will Jacks Catch Video pudhari
स्पोर्ट्स

Will Jacks Catch Video: ओह बॉय.. सूर्याची दोन शब्दात प्रतिक्रिया; विल जॅक्सच्या कॅचने 'ती' ऐतिहासिक आठवण झाली ताजी

Anirudha Sankpal

Suryakumar Yadav Catch Video: भारताचा माजी टी २० कर्णधार सूर्यकुमार यादवने २०२४ च्या टी २० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरचा एक किलर कॅच पकडला होता. या कॅचच्या जोरावरच भारताने वर्ल्डकप जिंकला होता. आता असाच सेम कॅच इंग्लंडच्या विल जॅक्सने द हंड्रेड स्पर्धेत पकडला आहे.

विल जॅक्स द हंड्रेड स्पर्धेत एमआय लंडन कडून खेळतो. एमआय लंडनचा गुरूवारी सामना स्प्रिटशी झाला. हा सामना एमआय लंडनने चार विकेट्सने जिंकला.

सामन्यात लंडन स्प्रिटने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी संघाचा सलामीवीर डी प्रीटोरियसने दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं होतं. मात्र नंतर विल जॅक्सने त्याचा भन्नाट कॅच पकडत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ४९ व्या चेंडूवर विल जॅक्सने जबरदस्त कॅच घेतला. नाथन सोवटरने डावखुऱ्या प्रीटोरियसला एक फुल लेंथ चेंडू टाकला होता.

त्यानंतर प्रोटोरियसने तो चेंडू लाँग ऑनच्या दिशेला उंच हवेत मारला. आता चेंडू सीमापार जाऊन पडणार तेवढ्यात लाँग ऑनला उभ्या असलेल्या विल जॅक्सने सीमारेषेच्या अगदी जवळ जाऊन तो चेंडू पकडला आणि तो पुन्हा आत मैदानात ढकलला. यावेळी जॅक्स हवेतच होता.

त्यानंतर त्याने सीमारेषेच्या आत डाईव्ह मारून तो झेल पुन्हा पकडला. हा झेल पाहून सूर्यकुमारच्या आयकॉनिक वर्ल्डकप कॅचची आठवण सर्वांना झाली. त्यावेळी देखील असाच हुबेहूब कॅच सूर्याने पकडला होता. हा झेल पाहून सूर्यकुमार यादवने देखील प्रतिक्रिया दिली. त्याने 'ओह.. बॉय' अशी छोटी मात्र समर्पक प्रतिक्रिया दिली. या झेलनंतर प्रीटोरियसची २८ चेंडूत केलेली ५२ धावांची खेळी संपुष्टात आली.

द हंड्रेड मधील या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना लंडन स्प्रिंटने पाच विकेट्स गमावून १६० धावा केल्या होत्या. एमआय लंडनने हे आव्हान सहा विकेट्स गमावून ९४ चेंडूत पार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT