विराटचा जुना फोटो viral pudhari
स्पोर्ट्स

Virat Kohli: ...जेव्हा अनुष्काला भेटण्यासाठी विराटने मोडले होते आयपीएलचे प्रोटोकॉल

Virat Broke Protocol: विराट कोहलीचा एक फोटो viral होतो आहे. यात विराट प्रोटोकॉल तोडून अनुष्काला स्टँडमध्ये भेटतो

अमृता चौगुले

Virat kohli Anushka sharma IPL Photo

पुणे : मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने पंजाबच्या टीमवर दणदणीत विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्सच्या या विजयामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या दरम्यान विराट कोहलीचा एक फोटो viral होतो आहे. यात विराट प्रोटोकॉल तोडून अनुष्काला स्टँडमध्ये भेटतो आहे.

2015च्या आयपीएल सामान्यावेळी हा किस्सा घडला होता. त्यावेळी सामना विजयानंतर विराटने नियम मोडत स्टँडमध्ये जाऊन उभी असलेल्या अनुष्काला मिठी मारत विजयाचा आनंद साजरा केला होता. खर तर विराटचे हे वागणे आयसीसीच्या नियमावली विरुद्ध होते. नियमानुसार सामान्यदरम्यान खेळाडूना त्यांच्या नियुक्त जागेतून बाहेर पडण्याची परवानगी नाही. तसेच संघाव्यतिरिक्त इतर लोकांशी संवाद साधायला परवानगी नसते.

‘तो संघाचा कॅप्टन आहे. त्यामुळे खेळाडूला लागू असलेल्या नियमाबाबत त्याला योग्य कल्पना आहे. Anti curruption and security unit च्या एका अधिकाऱ्याने विराटबाबत हे सांगितले होते. यावेळी एखाद्या नवख्या खेळाडूकडून अपेक्षित आहे. पण विराट सारखा खेळाडू असे करतो तेव्हा चर्चा होणारच असेही यावेळी त्या अधिकाऱ्याने म्हटले होते.

मंगळवारच्या विजयानंतर देखील अनुष्का देखील आपल्या पतीकडे धावत गेली आणि त्याला मिठी मारली. विराटने कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केल्यानंतर मिळालेला हा विजय त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. ट्रॉफी उचलल्यानंतर बोलताना विराट म्हणला, ‘ हा विजय फक्त टीममेटसाठी नाही तर अनुष्कासाठीही खास आहे. अनुष्काने भावनिकदृष्ट्या खूप सहन केले आहे. माझे करियरचे चढ उतार, खेळासाठी येणे जाणे यातून तिने बरेच सहन केले आहे. ती बेंगलोरची असल्याने या टीमशी जास्त कनेक्ट होऊ शकली. RCB शी कनेक्ट असणे तिच्यासाठीही खूप खूप स्पेशल आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT