IPL 2026 Champion Prediction: IPL 2026 च्या प्लेऑफमध्ये RCB, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या चार संघांनी जागा मिळवली आहे. आता ट्रॉफी कोण उचलणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या प्रश्नाचे उत्तर 31 मे रोजी मिळणार असले, तरी त्याआधीच भारतीय क्रिकेटमधील ‘बापू’ म्हणून ओळखला जाणारा अक्षर पटेल याने मोठी भविष्यवाणी केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या अक्षर पटेलने सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा संघ यंदाचा IPL चॅम्पियन होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, यामागे त्याने एक महत्त्वाचे आणि धोकादायक कारणही सांगितले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना संपल्यानंतर पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये समालोचक मुरली कार्तिक यांनी अक्षर पटेलला प्रश्न विचारला. प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चारही संघांविरुद्ध खेळल्यानंतर त्याच्या मते कोणता संघ ट्रॉफी जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे, असे विचारण्यात आले. यावर अक्षरने सनरायझर्स हैदराबादचे नाव घेतले.
अक्षर पटेलने सांगितले की, सनरायझर्स हैदराबादचा टॉप-3 फलंदाजांचा फॉर्म हा त्यांचा सर्वात मोठा ताकदीचा मुद्दा आहे. तो म्हणाला, “जेव्हा SRH च्या टॉप-3 फलंदाजांकडून धावा होतात, तेव्हा त्या संघाला रोखणं जवळपास अशक्य होतं.” याच कारणामुळे त्याने SRH ला यंदाच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं आहे.
अक्षर पटेलच्या या भविष्यवाणीला काही जुने आकडेही साथ देताना दिसत आहेत. IPL इतिहासात प्लेऑफ सुरू झाल्यानंतर टॉप-2 मध्ये नसलेल्या संघाने फक्त एकदाच ट्रॉफी जिंकली आहे आणि तो संघ म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. SRH ने 2016 मध्ये हा पराक्रम केला होता. ‘ऑरेंज आर्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाने तेव्हा सर्वांना धक्का देत विजेतेपद पटकावले होते.
विशेष म्हणजे, 2016 मध्ये SRH ने ऑस्ट्रेलियन कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली होती. आणि आता 2026 मध्येही संघाचं नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स करत आहे. यामुळे अनेक चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, SRH 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा IPL मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? आता अक्षर पटेलची भविष्यवाणी खरी ठरणार की दुसरा संघ बाजी मारणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.