स्पोर्ट्स

IND vs WI T20 : भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी पॉवेलकडे नेतृत्व

Arun Patil

ब्रिजटाऊन, वृत्तसंस्था : भारताविरुद्ध गुरुवारपासून खेळवल्या जाणार्‍या 5 टी-20 (IND vs WI T20) सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीजने 15 सदस्यीय प्राथमिक संघात यष्टिरक्षक-फलंदाज शाय होप व जलदगती गोलंदाज ओशेन थॉमस यांना पुनरागमनाची संधी दिली आहे. संघाचे नेतृत्व रोव्हमन पॉवेलकडे असेल, असे क्रिकेट विंडीजने जाहीर केले.

29 वर्षीय शाय होपने आपला शेवटचा टी-20 सामना गतवर्षी कोलकाता येथे खेळला. यापूर्वी 3 सामन्यांच्या वन-डे मालिकेत त्याच्याकडे विंडीज संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली गेली होती. 26 वर्षीय थॉमसनेदेखील आपला शेवटचा टी-20 सामना कराचीत डिसेंबर 2021 मध्ये खेळला होता. काईल मेयर्सची सध्याच्या संघात उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

निवड समितीचे अध्यक्ष डेस्मंड हेन्स यांनी पुढील वर्षी होणारी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा नजरेसमोर ठेवून सध्याची संघनिवड केली असल्याचे यावेळी सांगितले. आमच्या संघात बरेच मॅच विनर्स आहेत आणि पुढील महिन्यात खेळवल्या जाणार्‍या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूंची आणखी सरस तयारी होऊ शकेल, असे हेन्स याप्रसंगी म्हणाले.

भारत-विंडीज टी-20 मालिका (IND vs WI T20)

तारीख            लढत           भारतीय प्रमाण वेळ     ठिकाण
3 ऑगस्ट     पहिली लढत      रात्री 8 वाजता            टारौबा
6 ऑगस्ट     दुसरी लढत        रात्री 8 वाजता          प्रोव्हिडन्स
8 ऑगस्ट     तिसरी लढत       रात्री 8 वाजता          प्रोव्हिडन्स
12 ऑगस्ट   चौथी लढत         रात्री 8 वाजता          लॉडरहिल
13 ऑगस्ट   पाचवी लढत       रात्री 8 वाजता          लॉडरहिल

विंडीजचा संघ : रोव्हमन पॉवेल कर्णधार, काईल मेयर्स उपकर्णधार, जॉन्सन चार्ल्स, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमेयर, जेसॉन होल्डर, शाय होप, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेन्डॉन किंग, ओबेड मकॉय, निकोलस पूरन, रोमारिओ शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशेन थॉमस.

हेही वाचा…

SCROLL FOR NEXT