भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर किंवा देवदत्त पडिक्कल सारख्या खेळाडूंची भारतीय टी-२० संघात निवड का होऊ शकत नाही, याचे सडेतोड कारण दिले आहे. pudhari
स्पोर्ट्स

Virender Sehwag |"भारतीय संघात जागा आहे कुठे?" : श्रेयस अय्यर, पडिक्कलच्‍या टीम इंडियातील निवडीवर सेहवाग काय म्‍हणाला?

IPLच्‍या प्रत्येक हंगामात असे खेळाडू समोर येतात ज्यांना वाटते की भारतासाठी खेळावे

पुढारी वृत्तसेवा

Virender Sehwag on India T20 Selection

नवी दिल्‍ली: दरवर्षीप्रमाणे, आयपीएल २०२६ च्या हंगामातही अनेक भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीने राष्ट्रीय निवडीसाठी दावा ठोकला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (RCB) स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटीदार यांनी आपल्या फलंदाजीने पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहे. क्रिकेट विश्‍लेषज्ञक आणि चाहते त्यांना भारतीय संघात स्थान मिळावे अशी मागणी करत आहेत. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर किंवा देवदत्त पडिक्कल सारख्या खेळाडूंची भारतीय टी-२० संघात निवड का होऊ शकत नाही, याचे सडेतोड कारण दिले आहे.

दिनेश कार्तिकेन केले पडिक्कलच्‍या कामगिरीचे कौतूक

देवदत्त पडिक्कलसाठी आयपीएल २०२६ चा हंगाम आतापर्यंत उत्कृष्ट ठरला आहे. त्याने केवळ सहा डावांत २०८ धावा केल्‍या आहेत. यात तीन धडाकेबाज अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राईक रेट १८४ पेक्षा जास्त आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पडिक्कलने आतापर्यंत भारतासाठी २ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळले आहेत, परंतु टी-२० फॉरमॅटमध्ये तो शेवटचा पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला होता.आरसीबीचे मार्गदर्शक दिनेश कार्तिकने देखील पडिक्कलच्या फॉर्मचे कौतुक करताना म्हटले होते की, बीसीसीआय निवड समितीसाठी त्याला दुर्लक्षित करणे कठीण होईल. मात्र, वीरेंद्र सेहवागने यावर असहमती दर्शवत एक वेगळा दृष्टीकोन मांडला आहे.

वीरेंद्र सहवाग काय म्‍हणाला?

'क्रिकबझ'शी बोलताना सेहवाग म्हणाला, "दिनेश कार्तिक म्हणतोय की पडिक्कलने भारतासाठी खेळायला हवे, पण प्रत्येक हंगामात असे खेळाडू समोर येतात ज्यांना वाटते की त्यांनी भारतासाठी खेळावे. मात्र, भारतीय संघात जागा आहे कुठे?" सध्याचा भारतीय संघ इतका मजबूत आहे की पडिक्कल, पाटीदार किंवा श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांच्यासाठी संघात जागाच शिल्लक नाही.

तुम्‍ही कुणाला संघातून डच्‍चू देणार?

"रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, देवदत्त पडिक्कल यांच्यासाठी संघात जागा नाहीये, आणि असे अनेक खेळाडू आहेत. अगदी वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल यांच्यासाठीही जागा नाही. असे पाच खेळाडू आहेत जे धावा करत आहेत, पण त्यांच्यासाठी तुम्ही कुणाला संघातून डच्चू देणार? जागा कुठे आहे?"

भारतीय टी-२० संघाची दमदार कामगिरी

भारतीय टी-२० संघ सध्या जगातील सर्वात बलाढ्य संघ मानला जात आहे. भारताने २०२४ आणि २०२६ असे सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही टी-२० मालिका गमावलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT