Virat Kohli IPL Retirement :
सोशल मीडियावरून विराट कोहली आता आयपीएलमधून निवृत्ती घेणार. त्यानं रॉयल चॅलेंजर बंगळुरूसोबतचा करार वाढवण्यास नकार दिला आहे असे वृत्त येत आहे. याचबरोबर रेव्हस्पोर्ट्सचे पत्रकार रोहित जुगन यांनी देखील विराट कोहलीने आरसीबीसोबतचा व्यासायिक कराराचं नूतनीकरण केलेलं नाही असा दावा केला होता.
यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यानं आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओत बोलताना सांगितलं की, 'विराट कोहलीने आरसीबीसोबत व्यासायिक करार करण्यास नकार दिला आहे असं वृत्त आहे. मात्र त्याचा अर्थ काय आहे? तो नक्कीच आरसीबीकडून खेळेल. जर तो खेळणार असेल तर तो नक्कीच आरसीबीकडूनच खेळेल.'
आकाश चोप्रा पुढं म्हणाला, 'त्यानं नुकतीच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर तो फ्रेंचायजी का सोडेल. तो कुठंही जाणार नाही. करार नाकारल्याचा फक्त अंदाज आहे. काय सांगावं त्याकडं दोन करार असतील. व्यासायिक करार हा प्लेईंग करारापेक्षा वेगळा असतो. त्यानं व्यासायिक करार नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. आरसीबी फ्रेंजायजी विक्रीला काढल्याचे देखील वृत्त आहे.'
मेगा लिलावानंतर आयपीएलमधील खेळाडूंसोबत एका वर्षाचा करार केला जातो. मात्र फ्रेंचायजी त्यांना पुढं रिटेन करू शकते. विराट कोहलीने आरसीबीच्या २०२५ च्या आयपीएल विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. त्यानंतर फ्रेंचायजीनं आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. गेल्या हंगामात त्यानं १५ सामन्यात ६५७ धावा केल्या होत्या. त्यानं या धावा ५४.७५ च्या सरासरीनं आणि १४४.७१ च्या स्ट्राईक रेटनं केल्या होत्या. यात त्याच्या नावावर आठ अर्धशतकी खेळींचा समावेश होता.