Virat Kohli RCB vs GT: गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात गुजरातने २०५ धावांचे टार्गेट देऊनही ते सामना जिंकू शकले नाहीत. विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत पुन्हा एकदा आपल्याला चेस मास्टर का म्हटलं जातं ते सिद्ध करून दाखवलं. आरसीबीने हे आव्हान १९ व्या षटकातच पार केलं. विराटने ४१ चेंडूत ८१ धावांचा तडाखा दिला.
विराटने फक्त गुजरातला पराभवाची धूळ चारली नाही तर त्याने एकप्रकारे गुजरातची प्रेस कॉन्फरन्स देखील हायजॅक केली. गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या कौतुकाचे पूल बांधले. त्यांनी गुजरातची टोटल कमी नव्हती तर समोर विराट कोहली होती. सुरूवातीला आम्ही त्याचे झेल सोडले अन् त्यानं आम्हाला चांगलीच शिक्षा दिली असं सांगितलं.
विजय दहिया पत्रकार परिषदेत विराट कोहलीवर भरभरून बोलले, ते म्हणाले, 'सहसा तुम्ही हरला की तुम्ही म्हणता अजून जरा धावा करायला हव्या होत्या. मात्र सामन्याच्या मध्यापर्यंत आम्हाला ही धावसंख्या खूप वाटत होती. आम्ही ही धावसंख्या डिफेंड करू असा विश्वास आम्हाला होता. आम्हाला विराट कोहलीविरूद्ध पहिल्याच चेंडूवर संधी मिळाली होती. मात्र त्यानंतर ही त्याची इनिंग होती त्यानं आमच्याकडून सामना हिसकावून घेतला.'
दहिया पुढे म्हणाले, 'मला असं वाटतं की हा अनुभवी खेळाडू अजून खेळतोय ते त्याच्या अनुभवाच्या जोरावर. त्यांना माहिती आहे की कसं जुळवून घ्यायचं. विराट हे याचं उत्तम उदाहरण आहे. तुम्ही त्याच्या संघातील अनेक युवा खेळाडू देखील पाहता जे चांगली कामगिरी करत आहे. हा विषय अनुभवी विरूद्ध युवा असा नाहीये. प्रत्येक संघात प्रत्येकाचा एक रोल असतो.
ते सर्व खेळाडू ध्येयानं वेडे झालेले होते आणि प्रेरित होते. त्यांना दुसऱ्याकडे पाहण्याची गरज नाही. वरिष्ठ खेळाडूने प्रत्येकवेळी तरूण खेळाडूंना प्रेरित केलं पाहिजे असं नाही. ते स्वतःलाच प्रेरित करू शकतात.'
गुजरात टायटन्सचे कोच दहिया यांनी विराट कोहलीच्या दैदिप्यमान प्रवासाबाबत देखील मत व्यक्त केलं. तो म्हणाला, 'हा मानसिकतेचा प्रश्न आहे. तुम्ही त्याची एनर्जी पाहिली तर ती अफलातून आहे. त्याच्याकडे स्कील्स आहेत. खेळाची जाण आहे. त्याचा अवेअरनेस आणि एनर्जी त्याची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. सामना झाल्यानंतर मी त्याच्यासोबत बोलत होतो. तो नाराज होता. तो म्हणाला, मी ही खेळी शतकात रूपांतरित करू शकलो असतो. मी त्याला म्हणालो की प्रत्येक दिवशी अशी कामगिरी करतो तो यबाबत वेगळ्या दृष्टीकोणातून विचार करतो. त्याचा पहिल्या चेंडूवर झेल सोडला गेला होता. मात्र तरी देखील त्याने खेळपट्टी किती सोपी आहे असंच भासवलं. मात्र ती खेळपट्टी फलंदाजीला सोपी नव्हती.'
दहिया पुढे म्हणाले की, 'ज्यावेळी तुम्ही परिस्थितीवर अधिराज्य गाजवण्याची वृत्ती ठेवून खेळता त्यावेळी तुम्ही गोलंदाजाला तुम्हाला पाहिजे तिथं गोलंदाजी करायला भाग पाडता. विराट कोहली अशाच प्रकारे खेळतो. तो जगातील सर्वात चांगल्या गोलंदाजावर देखील दबाव टाकू शकतो. विराट कोहली असाच आहे. त्याचा माईंडसेटच त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळे करतो. तो आजही सर्वोत्त धावा करणारा खेळाडू आहे.'