Virat Kohli Tattoo: विराट कोहलीच्या हातावर कमळाचा नवीन टॅटू; काय आहे अर्थ?

विराटने आपल्या हातावर कमळ आणि पिओनी या फुलांची नक्षी असलेला 'फुल-स्लीव्ह' टॅटू काढला आहे.
Virat Kohli Tattoo
Virat Kohli Tattoofile photo
Published on
Updated on

Virat Kohli Tattoo

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगच्या २०२६ च्या हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी चर्चेचे कारण त्याची फलंदाजी नसून त्याच्या डाव्या हातावर कोरलेला एक नवीन आणि अतिशय आकर्षक 'टॅटू' आहे. विराटने आपल्या हातावर कमळ आणि पिओनी या फुलांची नक्षी असलेला 'फुल-स्लीव्ह' टॅटू काढला आहे.

Virat Kohli Tattoo
Virat Kohli: विराट कोहलीने अर्शदीपची केली हुबेहूब नक्कल, रोहित शर्मालाही हसू आवरेना; पाहा Viral Video

काय आहे या टॅटूचा अर्थ?

विराटचा हा टॅटू 'एलियन्स टॅटू इंडिया' या प्रसिद्ध स्टुडिओने साकारला आहे. हा टॅटू केवळ फॅशन नसून त्यामागे एक सखोल अर्थ दडलेला आहे. कलाकारांच्या मते, हा टॅटू विराटच्या आजवरच्या जीवनप्रवासाचे प्रतिबिंब आहे. यात त्याच्या व्यक्तिमत्त्वातील बदल, त्याने आयुष्यात पार केलेले अडथळे आणि सध्याची त्याची वैचारिक स्थिती दर्शवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा टॅटू अद्याप पूर्ण झालेला नसून, क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून विराट हा टॅटू टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहे.

विराटच्या हातावर आधीच काही टॅटू होते, ज्यात भगवान शंकरापासून प्रेरित असलेल्या एका 'आर्मबँड'चा समावेश होता. हे टॅटू फिकट झाले होते. नवीन डिझाइन करताना जुन्या विखुरलेल्या टॅटूना एकत्र करून, त्यांना एक नवा आणि सुसंगत आकार देण्याचे काम कलाकारांनी केले आहे.

'कमळ' आणि संयमाचे प्रतीक

कोहलीच्या कोपरापासून सुरू होणाऱ्या या टॅटूमध्ये 'मंडाला' आर्ट आणि 'डॉटवर्क'चा वापर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रतीक म्हणजे 'कमळ'. चिखलात उमलूनही चिखलापासून अलिप्त राहणारे आणि पवित्रतेचे प्रतीक असलेले कमळ विराटच्या संयमी वृत्तीचे दर्शन घडवते. जीवनातील चढ-उतार आणि संघर्षातही स्वतःची शांतता आणि शिस्त कायम राखणाऱ्या विराटच्या स्वभावाशी हे प्रतीक साधर्म्य राखते, असे टॅटू आर्टिस्टने सांगितले.

Virat Kohli Tattoo
Virat Kohli: विराट कोहलीला झालंय काय? IPL 2026 आधीच RCB संघावर संतापला; नेमकं काय म्हणाला?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news