Virat Kohli Video Viral Pudhari
स्पोर्ट्स

Virat Kohli Video Viral: भुवनेश्वर कुमारच्या यॉर्करमुळे विराट कोहलीचा तोल गेला; बॉलच कळला नाही, व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli: IPL 2026 पूर्वीच्या सरावात विराट कोहली भुवनेश्वर कुमारच्या यॉर्करवर पूर्णपणे गोंधळलेले दिसले. या व्हिडिओमध्ये कोहलीचा बॅलन्स बिघडल्याचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rahul Shelke

Virat Kohli Bhuvneshwar Yorker Video: IPL 2026 चा हंगाम सुरू होण्यास काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे सगळ्या संघांची जोरदार तयारीही सुरु आहे. गतविजेता Royal Challengers Bengaluru संघानेही सरावाला सुरुवात केली असून, संघाचा प्रमुख खेळाडू विराट कोहली लंडनहून परतल्यानंतर संघात सहभागी झाला आहे. दीर्घ विश्रांतीनंतर कोहली पुन्हा मैदानावर उतरत असल्यामुळे त्याच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरावादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भुवनेश्वर कुमारच्या यॉर्कर चेंडूवर कोहली पूर्णपणे गोंधळलेला दिसत आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नेट्समध्ये फलंदाजी करताना भुवनेश्वरचा अचूक यॉर्कर कोहलीला कळलाच नाही. शॉट खेळण्याआधी त्याची बॅट हवेतच थांबली आणि पायांचा बॅलन्सही पूर्णपणे बिघडला.

हा क्षण पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला, कारण कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजालाही अशा प्रकारे यॉर्कर टाकणं दुर्मीळच आहे. मात्र, हेच क्रिकेटचे वैशिष्ट्य आहे.

कोहलीसाठी IPL 2026 हा हंगाम महत्त्वाचा मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तो फक्त IPL मध्येच खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे अधिक लक्ष असेल.

इतकंच नाही, तर कोहलीसमोर यंदा मोठा विक्रम करण्याची संधीही आहे. IPLच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर असून त्याने 267 सामन्यांत 8661 धावा केल्या आहेत. या हंगामात तो 9000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू बनू शकतो.

दरम्यान, Royal Challengers Bengaluruचा पहिला सामना 28 मार्चला होणार असून पहिल्याच सामन्यात त्याची लढत Sunrisers Hyderabad विरुद्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोहलीचा फॉर्म कसा असणार, याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. एकूणच, सरावातील एका चेंडूवर कोहलीचा बॅलन्स बिघडला असला तरी, आगामी हंगामात तो पुन्हा आपल्या आक्रमक अंदाजात दिसेल, अशी चाहत्यांना आशा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT