Virat Kohli Pudhari Photo
स्पोर्ट्स

Virat Kohli Tweet : तुम्ही तेव्हाच फेल होता जेव्हा.... विराटचं ट्विट निवृत्ती की वर्ल्डकपची तयारी?

Anirudha Sankpal

Virat Kohli Cryptic Tweet :

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ५ टी २० सामन्यांची मालिका होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ऑस्ट्रेलियात पोहचलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. विराट आणि रोहितचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरण्याची शक्यता देखील आहे. तसंच रोहितचं वनडे कर्णधारपद गेल्यानंतर हे दोघे वनडे वर्ल्डकप खेळणार का हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, विराट कोहलीनं एक क्रिप्टिक ट्विट करून या चर्चेला अजून ऊत आणला आहे. विराट कोहली आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, 'वास्तविक तुम्ही त्याचवेळी फेल होता ज्यावेळी तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता.'

विराट कोहली सहसा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाही. वैयक्तीक पोस्ट तर नाहीच नाही! त्यामुळं विराट कोहलीच्या या पोस्टची चर्चा अन् त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. विराट कोहलीनं काहीतरी निर्णय घेतला आहे असा अंदाज चाहते आणि क्रिकेट जाणकार व्यक्त करत आहेत.

कोहलीची सध्याची स्थिती

  • कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यांनी गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर (बारबाडोस येथे) निवृत्तीची घोषणा केली होती.

  • यावर्षी १० मे रोजी त्यांनी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.

  • ते सध्या केवळ वनडे (ODI) फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. यावर्षी ते फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसले होते.

  • आता १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत कोहली खेळताना दिसतील. या मालिकेत रोहित शर्मा देखील संघात आहेत.

  • कोहली आणि रोहित शर्मा हे नवीन वनडे कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळतील.

विराट कोहली टीम इंडियासोबत १५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे, ज्यातील पहिला सामना १९ ऑक्टोबरला होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT