Usain Bolt Fitness  Canva
स्पोर्ट्स

Usain Bolt Fitness : बोल्टला आता पायऱ्या चढतानाही लागतोय दम; पृथ्वीवरील सर्वात वेगवान मनुष्याला झालंय तरी काय?

कधीकाळी पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान मनुष्याला आता मात्र पायऱ्या चढल्या तरी श्वास लागतोय. ज्यावेळी उसैन बोल्ट हा ट्रॅकवर आपला जलवा दाखवत होता त्यावेळी तो चांगल्या शेपमध्ये दिसायचा. मात्र...

Anirudha Sankpal

Usain Bolt Fitness :

उसैन बोल्ट हे नाव घेतलं तरी त्याचा ट्रॅकवर तुफान वेगाने पळणारे चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र याच कधीकाळी पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान मनुष्याला आता मात्र पायऱ्या चढल्या तरी श्वास लागतोय. ज्यावेळी उसैन बोल्ट हा ट्रॅकवर आपला जलवा दाखवत होता त्यावेळी तो चांगल्या शेपमध्ये दिसायचा. मात्र आता आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा बोल्ट दिवसातील बराच काळ घरी बसूनच असतो. त्यानं २०१७ मध्ये निवृत्ती घेतली होती. बोल्टच्या बाबतीत नेमकं काय झालं आहे.... त्याला कोणता आजार तर झाला नाही ना असा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असेल.

मात्र उसैन बोल्टला कोणताही आजार झालेला नाही तर तो वडील झाल्यापासून वडिलांच्या भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे निभावतोय. त्यानं धावणं किंवा स्प्रिंटिग सर्व काही सोडून दिलं आहे. तो जास्तीजास्त घरातच असतो.

बोल्ट द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'मी सकाळी मुलांशा शाळेला सोडायच्या थोडावेळ आधी उठतो. त्यानंतर माझ्याकडे करण्यासारखं काही नसलं तर मी फक्त चील करतो. मी कधी कधी वर्कआऊट करतो. तेही माझा मूड असेल तर मी व्यायाम करतो. नाहीतर मी मुलं शाळेतून येईपर्यंत एखादी सरीज पाहतो आणि चील करतो. त्यानंतर मी माझा वेळ माझ्या मुलांसोबत घालवते. ते मला जास्त त्रास द्यायला लागले की मी तिथून निघून जातो.' बोल्ट पुढे म्हणाला, 'त्यानंतर मी घरीच असतो मी चित्रपट पाहतो.

उसैन बोल्ट हा ५ वर्षाची मुलगी ऑलिम्पिया लाईटनिंगचा पिता आहे. त्याचबरोबर बोल्टला ४ वर्षाचे सेंट लिओ आणि थंडर हे दोन जुळे मुलगे देखील आहेत. सध्या तरी या मुलांना त्यांचे वडील किती मोठे स्टार होते याची कल्पना नसेल. मात्र आता बोल्टकडं पाहून तो ट्रॅकवर अजूनही अनबिटेबल आहे याच्यावर विश्वास बसणार नाही.

ट्रॅक सोडल्यानंतर बोल्ट काय करतोय याबाबत तो म्हणाला, 'मी सर्वसाधारणपणे जीम वर्कआऊट करतोय. मी जीमचा फॅन नाहीये. मात्र मला वाटतं की मी बऱ्याच दिवसांपासून टचमध्ये नाहीये. मला आता पळायला सुरूवात करायला हवी. कारण मी ज्यावेळी पायऱ्या चढतो त्यावेळी मला दम लागतोय. मला वाटतंय की मला आता जोमानं वर्कआऊट करावं लागणार आहे. मला दम लागू नये म्हणून पुन्हा ट्रॅकवर धावावं लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT