

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने सलग दुसर्यांदा ग्रँड स्विस स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर तिने या यशाचा आनंद आपल्या आईसोबत साजरा केला आणि त्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या विजयामुळे तिला कँडिडेटस् स्पर्धेत स्थान निश्चित करता आले.
जेतेपदानंतर बक्षीस वितरण सोहळ्यात वैशालीने विजय साजरा करण्यासाठी आपल्या आईला मंचावर बोलावले आणि तिच्या हातातून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारली. या मायलेकींचा हृदयस्पर्शी क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
यावेळी वैशालीसोबत तिची आई आणि भाऊ आर. प्रज्ञानंद उपस्थित होते. हे वैशालीचे सलग दुसरे ग्रँड स्विस विजेतेपद होते. यावर्षी, तिने अंतिम फेरीत चीनच्या माजी विश्वविजेती झोंगी टॅनसोबत कडवा संघर्ष करत सामना बरोबरीत सोडवून विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, रशियन खेळाडू कॅटेरीनाने अझरबैजानच्या उल्व्हिया फतालिएव्हासोबत बरोबरी साधत गुणतालिकेत वैशालीसोबत अव्वल स्थान पटकावले. तसेच कँडिडेटस्साठी पात्रता मिळवली.