U19 Asia Cup live updates Vaibhav Suryawanshi century
नवी दिल्ली : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताचा सामना यूएईशी सुरू आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची चांगली घोडदौड सुरू आहे. वैभव सूर्यवंशीने फक्त ५६ चेंडूत शतक झळकावले असून या स्पर्धेतील हे पहिले शतक आहे. दरम्यान, भारताची धावसंख्या २४ षटकांत १ बाद २०० धावा अशी आहे.
वैभव सूर्यवंशीने ५ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या आहेत. २१ षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद १६१ होती. आयुष म्हात्रेसोबत सूर्यवंशी डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये असतानाच भारताला पहिला धक्का आयुष म्हात्रेच्या रूपात बसला. त्याला युग शर्माच्या गोलंदाजीवर सालेह अमीनने झेलबाद केले. आयुषने ११ चेंडूत ४ धावा केल्या, ज्यात एक चौकार होता. ७ षटकांनंतर, भारताच्या १९ वर्षांखालील संघाने १ बाद ४४ धावा केल्या होत्या.
या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने १४ व्या षटकात १०० धावांचा टप्पा गाठला. त्यावेळी आरोन जॉर्जने ३८ चेंडूत ३२ धावा केल्या. १४ षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद १०० होती.
वैभव सूर्यवंशीच्या शतकानंतर लगेचच, आरोन जॉर्जने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५७ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारत ५० धावा पूर्ण केल्या. या दोन्ही फलंदाजांनी आता ११५ चेंडूत १६९ धावा जोडल्या आहेत. वैभव ११५ धावांवर खेळत आहे, तर जॉर्ज ५२ धावांवर खेळत आहे.