WTC 2025-27 Points Table: तिकडे न्यूझीलंड जिंकली अन् इकडे गिलच्या काळजात धस्स झालं.... एका विजयानं WTC चं सगळं गणितच बदललं

न्यूझीलंडच्या विजयामुळं भारताला तोटा तर पाकिस्तानला झाला फायदा
WTC 2025-27 Points Table
WTC 2025-27 Points Tablepudhari photo
Published on
Updated on
Summary
  • भारत टॉप ५ मधूनही बाहेर फेकला गेला

  • न्यूझीलंडची तिसऱ्या स्थानावर झेप

  • पाकिस्तान भारताच्या वर

WTC 2025-27 Points Table: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याकडे फक्त त्या दोन देशातील क्रिकेट चाहत्यांचे नाही तर भारतातील चाहत्यांचेही लक्ष लागून राहिले होते. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजचा ९ विकेट्स राखून पराभव केला.

WTC 2025-27 Points Table
The Family Man 4th Season: मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या श्रीकांतचं काय होणार.. जाणून घ्या फॅमिली मॅनचा चौथा सीजन कधी येणार

भारत टॉप ५ मधूनही बाहेर फेकला गेला

न्यूझीलंडच्या या विजयानंतर त्यांनी WTC पॉईंट टेबलमध्ये मोठी मजल मारली आहे. न्यूझीलंड या एका विजयामुळं थेट तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. मात्र न्यूझीलंडच्या या विजयाचा अन् विंडीजच्या पराभवाचा मोठा फटका भारताला बसलाय. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय कसोटी संघ आता टॉप ५ मधून बाहेर फेकला गेला आहे. भारताने मायदेशातील दक्षिण अफ्रिकेविरूद्धची २ कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी गमावली होती.

भारत आता WTC 2025-27 मध्ये अजून तीन कसोटी मालिका खेळणार आहे. भारत न्यूझीलंड. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका खेळणार आहे.

WTC 2025-27 Points Table
PM Modi: आता सरकार शोधून-शोधून वाटत आहे पैसे; PM मोदींचे ‘तुमचा पैसा, तुमचा अधिकार’ अभियान काय आहे?

न्यूझीलंडची तिसऱ्या स्थानावर झेप

न्यूझीलंड - वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या कसोटीबाबत बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या विजयामुळं त्यांच्या खात्यातील गुण हे ६६.६७ टक्के झाले आहे. ते सध्या तिसऱ्या स्थानावर असून दोन वेळची फायनलिस्ट ऑस्ट्रेलिया १०० टक्के विनिंग पर्सेंटेज घेऊन पहिल्या स्थानावर आहे. तर भारताला व्हाईट वॉश देणारी दक्षिण अफ्रिका ही ७५ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

WTC 2025-27 Points Table
Shivraj Patil Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

पाकिस्तान भारताच्या वर

भारताबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यात भारताला फक्त ४ सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यांचे गुण हे ४८.१५ टक्के आहेत. भारत सध्या WTC पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान ५० टक्के अंकांसह भारताच्या वर ५ व्या स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news