Team India 2026 Schedule: नवीन वर्षाचे स्वागत करून आता अनेक तास उलटले आहेत. हे येणारे नवे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी फार महत्वाचं मानलं जात आहे. याच वर्षात भारतीय क्रिकेटला एक वेगळी दिशा मिळू शकते. याच वर्षाच्या सुरूवातीलाच भारतीय संघ टी २० वर्ल्डकप खेळणार आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा वर्ल्डकप भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. भारत या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरणार आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत कोणत्याही संघाने सलग दोनवेळा टी २० वर्ल्डकप जिंकलेला नाही. टीम इंडिया हे मिथक तोडण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचे दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली नसणार. भारतीय संघ टी २० वर्ल्डकपसह काही महत्वाचे दौरे देखील करणार आहे. यातील इंग्लंड, बांगलादेश सारखे दौरे हाय व्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात टीम इंडियाचे क्रिकेट वेळापत्रक...
११ जानेवारी: पहिला वनडे, वडोदरा
१४ जानेवारी: दुसरा वनडे, राजकोट
१८ जानेवारी: तिसरा वनडे, इंदूर
२१ जानेवारी: पहिली टी-२०, नागपूर
२३ जानेवारी: दुसरी टी-२०, रायपूर
२५ जानेवारी: तिसरी टी-२०, गुवाहाटी
२८ जानेवारी: चौथी टी-२०, विशाखापट्टणम
३१ जानेवारी: पाचवी टी-२०, तिरुवनंतपुरम
कालावधी: ७ फेब्रुवारी ते ८ मार्च
यजमान: भारत आणि श्रीलंका
स्वरूप: १ कसोटी सामना आणि ३ वनडे सामने
१ जुलै: पहिली टी-२०, चेस्टर-ले-स्ट्रीट
४ जुलै: दुसरी टी-२०, मॅनचेस्टर
७ जुलै: तिसरी टी-२०, नॉटिंगहॅम
९ जुलै: चौथी टी-२०, ब्रिस्टल
११ जुलै: पाचवी टी-२०, साऊदॅम्प्टन
१४ जुलै: पहिला वनडे, बर्मिंगहॅम
१६ जुलै: दुसरा वनडे, कार्डिफ
१९ जुलै: तिसरा वनडे, लॉर्ड्स
स्वरूप: २ कसोटी सामने
भारतीय संघाचा बांगलादेश दौरा (सप्टेंबर २०२६ - संभाव्य)
स्वरूप: ३ वनडे आणि ३ टी-२० सामने
भारतीय संघाचा अफगाणिस्तान दौरा (सप्टेंबर-ऑक्टोबर २०२६)
ठिकाण: तटस्थ स्थळ (Neutral Venue)
स्वरूप: ३ टी-२० सामने
वेस्ट इंडिजचा भारत दौरा (सप्टेंबर-ऑक्टोबर २०२६)
स्वरूप: ३ वनडे आणि ५ टी-२० सामने
एशियन गेम्स २०२६
यजमान: जपान
स्वरूप: २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० सामने
श्रीलंकेचा भारत दौरा (डिसेंबर २०२६)
स्वरूप: ३ वनडे आणि ३ टी-२० सामने
पुरूष क्रिकेटच्या शेड्युलकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. त्यातच महिला क्रिकेट टीम देखील २०२६ मध्ये टी २० वर्ल्डकप खेळणार आहे. गेल्या वर्षी महिला क्रिकेट संघाने आपला पहिला वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर आता टीम इंडिया नव्या वर्षात वर्ल्डकप विजेता संघ म्हणून आपली मोहीम सुरू करणार आहे.
या वर्षी जून - जुलै महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला टी २० वर्ल्डकप खेळणार आहे. या वर्ल्डकपवर भारतीय चाहत्यांची नजर असणार आहे. जर महिला क्रिकेट संघाने वनडेपाठोपाठ टी २० चा वर्ल्डकप देखील जिंकला तर तो संपूर्ण भारतीयांसाठी एक अभिमानाचा क्षण असणार आहे.