T20 World Cup 2026 Ticket: भारतात होणाऱ्या टी २० वर्ल्डकप २०२६ ची तिकीट विक्री सुरू झाली आहे. कोलकाताचे इडन गार्डन मॅनेज करणाऱ्या बंगाल क्रिकेट असोसिएशनने बुधवारी १७ डिसेंबरला टी २० वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटाचे दर जाहीर केले. कोलकात्याच्या इडन गार्डनवर ग्रुप स्टेज, सुपर ८ अन् सेमी फायनलचे सामने होणार आहेत.
इडन गार्डन्सवर होणाऱ्या ग्रुप स्टेजमधील सामन्यांसाठी आणि नॉक आऊट सामन्यांसाठी वेगवेगळे तिकीट दर आहेत. १० व्या टी २० वर्ल्डकपची सुरूवात ही सात फेब्रुवारीपासून होणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यांसाठी १०० रूपयांपासून तिकीट दर सुरू होत आहेत. मात्र एवढ्या स्वस्त किंमतीत भारताच्या सामन्यांचे तिकीट मिळणार नाहीये.
बांगलादेश विरूद्ध इटली, इंग्लंड विरूद्ध इटली आणि वेस्ट इंडीज विरूद्ध इटली या ग्रुप स्टेजमधील सामन्यांच्या तिकीटांचे दर खूप स्वस्त ठेवण्यात आले आहेत. या सामन्यांसाठी बी प्रीमियम तिकीट हे ४ हजार रूपये. लोअर ब्लॉकचे बी आणि एल चे तिकीट हे प्रत्येकी १ हजार रूपये, लोअर ब्लॉक सी, एफ आणि के साठी २०० रूपये. तर लोअर ब्लॉक डी,ई,जी,एच आणि जे साठी देखील प्रत्येकी २०० रूपये तिकीट असणार आहे. तर एल १ ते तिकीट हे फक्त १०० रूपये असणार आहे.
वेस्ट इंडीज विरूद्ध बांगलादेश आणि इग्लंड विरूद्ध बांगलादेश या ग्रुपमधील सामन्यांचे तिकीट दर थोडे जास्त ठेवण्यात लागले आहेत. या सामन्यांसाठी बी प्रीमियम तिकीट हे ५ हजार रूपये. लोअर ब्लॉकचे बी आणि एल चे तिकीट हे प्रत्येकी १ हजार ५०० रूपये, लोअर ब्लॉक सी, एफ आणि के साठी १००० रूपये. तर लोअर ब्लॉक डी,ई,जी,एच आणि जे साठी देखील प्रत्येकी ५०० रूपये तिकीट असणार आहे. तर अपर ब्लॉक बी१, सी१, डी१, एफ१, जी१, एच१, के१ आणि एल १ ची तिकीट किंमत ३०० रुपये आहे.
इडन गार्डन्सवर होणाऱ्या सुपर आठ सामन्यांसाठी आणि सेमी फायनल सामन्यासाठी बी प्रीमियम तिकीटाचे दर हे १० हजार रूपये ठेवण्यात आले आहे. तर लोअर ब्लॉक बी आणि एल चे तिकीट हे ३ हजार रूपये, लोअर ब्लॉक सी, एफ आणि के यांच्या किंमती २५०० रूपये ठेवण्यात आल्या आहेत.
लोअर ब्लॉक डी, ई, जी, एच आणि जे यांच्या किंमती १५०० रूपये ठेवण्यात आल्या आहेत. तर अपर ब्लॉक बी१, सी१, डी१, एफ१ आणि जी१ एच१ के१ एल१ साठी ९०० रूपये तिकीट ठेवण्यात आलं आहे. इडन गार्डनवर लीग फेजमध्ये भारताचा कोणताही सामना होणार नाहीये.