Imran Khan Health Appeal Pudhari
स्पोर्ट्स

Pakistan: सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह 14 खेळाडूंनी पाकिस्तान सरकारला लिहिलं पत्र; काय आहे कारण?

Imran Khan Health Appeal: जगभरातील 14 माजी क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तान सरकारकडे इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह अनेक दिग्गजांनी वैद्यकीय उपचारांची मागणी केली आहे.

Rahul Shelke

Imran Khan Health Appeal Former Cricket Captains: भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह जगभरातील 14 माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला संयुक्त पत्र लिहून माजी पाकिस्तानी कर्णधार इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात यावेत, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

2023 पासून इम्रान खान कोठडीत आहेत. मात्र त्यांच्या आरोग्याविषयी बाहेर फारशी माहिती उपलब्ध नाही. अलीकडील काही अहवालांनुसार त्यांच्या उजव्या डोळ्याची सुमारे 85 टक्के दृष्टी कमी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांनी पुढाकार घेत सरकारला संयुक्त पत्र लिहिलं आहे.

या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ग्रेग चॅपेल, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, क्लाइव्ह लॉईड, मायकेल आथर्टन, डेव्हिड गॉवर, नासेर हुसेन यांच्यासह अनेक देशांचे माजी कर्णधार आहेत.

संयुक्त निवेदनात या दिग्गजांनी लिहिलं की, इम्रान खान यांना त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तात्काळ आणि योग्य उपचार मिळायला हवेत. तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार मानवीय व सन्मानजनक वागणूक दिली जावी, कुटुंबीयांच्या नियमित भेटींची परवानगी द्यावी आणि कायदेशीर प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या माजी कर्णधारांनी इम्रान खान यांच्या क्रिकेटमधील योगदानाचाही उल्लेख केला आहे. 1992 च्या विश्वचषकात पाकिस्तानला विजेतेपद मिळवून देणारे इम्रान खान हे केवळ ऑलराउंडर म्हणून नव्हे, तर प्रेरणादायी नेता म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. पुढे ते पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले. राजकीय मतभेद वेगळे असले तरी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या एका माजी राष्ट्रीय नेत्याला सन्मान मिळायलाच हवा, असे या पत्रात म्हटले आहे.

क्रिकेटने नेहमीच देशांमध्ये पूल बांधण्याचं काम केलं आहे. मैदानावरील प्रतिस्पर्धा सामना संपल्यानंतरही परस्पर सन्मान कायम राहतो,” असं सांगत या क्रिकेटपटूंनी पाकिस्तान सरकारला न्यायाने वागण्याचं आवाहन केलं आहे.

या निवेदनाचा सूर राजकीय नाही, हेही माजी कर्णधारांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसून, एका जागतिक खेळाडूच्या आरोग्याची आणि प्रतिष्ठेची काळजी म्हणून ही अपील करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT