माजी आयसीसी (ICC) सामनाधिकारी क्रिस ब्रॉड यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) सह माजी कर्णधार सौरव गांगुलीवर गंभीर आरोप केले आहेत. सौरवच्याकार्यकाळात भारतीय संघाला दंडातून वाचवण्यासाठी राजकीय दबावाचा उपयोग करण्यात आला. क्रिकेटमध्ये आता पूर्वीपेक्षा जास्त राजकारण सुरु आहे असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी जय शहांबाबतही खळबळजनक आरोप केला आहे.
Ex ICC Referee On Sourav Ganguly
लंडन : "भारतात क्रिकेटचा सामना होता. यावेळी मी पंच होता. "तुम्ही भारतात आहात, षटकांच्या गतीच्या नियमाबाबत अत्यंत सौम्य राहा, अशी धमकी देत भारतीय संघाला स्लो ओव्हर-रेट दंडापासून वाचवण्याच[ सूचना मला देण्यात आली होती," असा गंभीर आरोप इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि माजी पंच ख्रिस ब्रॉड यांनी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याच्यावर केला आहे. क्रिकेटमध्ये आता पूर्वीपेक्षा जास्त राजकारण सुरु आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीवेळी ब्रॉड म्हणाले, "मला काम करत राहायचे होते; पण २० वर्षे मला राजकीय आणि शारीरिकदृष्ट्या अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मी मागे वळून पाहतो आणि विचार करतो, २० वर्षे हे काम करण्यासाठी खूप मोठा काळ आहे. मला आनंद आहे की, मी नेहमीच योग्य आणि अयोग्य यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. जगाच्या काही भागात योग्य आणि अयोग्य यांच्यात खूप मोठे अंतर आहे. त्या दरम्यान खूप घाण आहे. मला वाटते की योग्य आणि अयोग्याचा दृढ दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीसाठी, राजकीय वातावरणात २० वर्षे टिकून राहणे हा एक उल्लेखनीय प्रयत्न आहे."
मुलाखतीदरम्यान ब्रॉडन यांनी सांगितले की, जागतिक क्रिकेट संघटनेने भारताला ओव्हर-रेट पेनल्टीपासून वाचवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. तथापि, ही घटना कधी किंवा कोणत्या सामन्यादरम्यान घडली हे त्यांनी स्पष्ट केले नाही. भारत खेळाच्या शेवटी भारत तीन किंवा चार षटके कमी होता. ही घटना सौरव गांगुली कर्णधार असलेल्या भारतीय संघाच्या सामन्याशी संबंधित होती. हा गुन्हा स्वयंचलित दंड होता. मला फोन आला की, 'सौरव गांगुली ऐकणार नाही. म्हणून मी सौरव गांगुली यांना फोन केला आणि म्हणालो, 'मी आता काय करावे असे तुम्हाला वाटते?' मला ते करायला सांगण्यात आले. बीसीसीआयच्या दबावामुळे गेलेल्या वेळेत फेरफार करून ओव्हर-रेट दंड मर्यादेपेक्षा कमी आणावा लागला. सुरुवातीपासूनच यात राजकारण होते. आता, बरेच लोक राजकीयदृष्ट्या अधिक जाणकार झाले आहेत किंवा फक्त डोळेझाक करतात, असा आरोपही त्यांनी केला.
फेब्रुवारी २०२४ मध्ये कोलंबो कसोटीने ब्रॉडची मॅच रेफरी म्हणून दीर्घ कारकीर्द संपली. त्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये ६२२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली. ब्रॉडने असाही दावा केला की अलिकडच्या काळात आयसीसीची नैतिकता कमी झाली आहे. क्रिकेटमध्ये भारत अमर्याद सत्तेचा अनुभव घेत आहे. दुबईमध्ये मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नेतृत्व सध्या बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह करत आहेत. व्यवस्थापन खूप कमकुवत झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मला वाटतं जेव्हा व्हिन्स व्हॅन डेर बिजल (आयसीसी पंच व्यवस्थापक) या पदावर होते. त्याकाळात त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला कारण त्यांना स्वत :ला क्रिकेटच्या पार्श्वभूमी होती. पण ते पदावरुन पायउतार झाल्यानंतर आयसीसीचे व्यवस्थापन खूपच कमकुवत झाले आहे. भारताकडे भरपूर पैसा आहे आणि आता त्यांनी अनेक प्रकारे आयसीसीचा ताबा घेतला आहे. मला आनंद आहे की मी आता तिथे नाही कारण ते पूर्वीपेक्षा जास्त राजकीय ठिकाण बनले आहे," असा दावाही ब्रॉड यांनी केला आहे.
ख्रिस ब्रॉड हे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि माजी पंच आहेत. तसेच इंग्लंडचा निवृत्त वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याचे ते वडील आहेत. पंच म्हणून त्यांनी एकूण १२३ कसोटी सामन्यांमध्ये पंचगिरी केली. त्याचा शेवटचा सामना फेब्रुवारी २०२४ मध्ये कोलंबो येथे झाला होता.