श्रेयस अय्यर Pudhari
स्पोर्ट्स

Shreyas Iyer : कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने एम.एस. धोनीला मागे टाकले; सलग सर्वाधिक T-20 आंतरराष्ट्रीय विजयाची नोंद

अय्यरच्‍या नेतृत्त्‍वाखाली टीम इंडियाने जिंकले सलग आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने

पुढारी वृत्तसेवा

Shreyas Iyer T20I captaincy record vs MS Dhoni : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज उपांत्य सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. निशिन (Nishin) येथील मैदानावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १६९/७ धावा केल्या आणि त्यानंतर श्रीलंकेचा डाव अवघ्या ४५ धावांत (९.५ षटकांत) गुंडाळला. श्रीलंकेचे नऊ खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत, तर त्यापैकी पाच खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताच्या विरोधात कोणत्याही संघाने नोंदवलेली ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. तसेच, धावांच्या फरकाने भारताचा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवा सर्वात मोठा विजय होता.

श्रेयस अय्यरने एम.एस. धोनीला मागे टाकले

सर्वाधिक सलग टी-२० आंतरराष्ट्रीय विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत श्रेयस अय्यरने एम.एस. धोनीला मागे टाकले आहे. अय्यरने आता सलग आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यापूर्वी धोनीने २०१२-१४ आणि २०१६ मध्ये सलग सात सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता या यादीत अय्यरची नजर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्या विक्रमांवर आहे. सूर्यकुमारने २०२३-२४ मध्ये सलग आठ आणि २०२५ मध्ये सलग नऊ सामने जिंकले होते; मात्र, २०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्याला केवळ कर्णधारपदावरूनच नाही, तर भारतीय टी-२० संघातूनही वगळण्यात आले होते. विराट कोहलीनेही २०१९-२० च्या काळात कर्णधार असताना सलग विजय मिळवण्याची मालिका साधली होती.

सलग सर्वाधिक T20I सामने जिंकणारे भारतीय कर्णधार

  • १४ - रोहित शर्मा (२०१९/२२)

  • ११ - रोहित शर्मा (२०२४)

  • ९ - विराट कोहली (२०१९/२०)

  • ९ - सूर्यकुमार यादव (२०२५)

  • ८ - सूर्यकुमार यादव (२०२३/२४)

  • ८ - श्रेयस अय्यर (२०२६)

  • ७ - एम.एस. धोनी (२०१२/१४)

  • ७ - एम.एस. धोनी (२०१६)

भारताचे धावांच्या फरकाने सर्वात मोठे T20I विजय

  • १६८ धावा - विरुद्ध न्यूझीलंड (२०२३)

  • १५० धावा - विरुद्ध इंग्लंड (२०२५)

  • १४३ धावा - विरुद्ध आयर्लंड (२०१८)

  • १३५ धावा - विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२४)

  • १३३ धावा - विरुद्ध बांगलादेश (२०२४)

  • १२७ धावा - विरुद्ध अफगाणिस्तान (२०२६)

  • १२४ धावा - विरुद्ध श्रीलंका (२०२६)

  • १०६ धावा - विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२३)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार

श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात इशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. इशानने चार चौकार आणि पाच षटकार फटकातव ४६ चेंडूंत ८० धावा केल्या. सूर्यवंशीने २१ चेंडूंत ३८ धावा केल्या. कर्णधार अय्यर (७) यांच्यासह चार खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने पॉवरप्लेमध्येच ३१ धावांत सहा विकेट्स गमावल्या. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली. श्रीलंकेचे तीन खेळाडू धावबाद (रन-आउट) झाले. आता शनिवार, ३ ऑक्‍टोबर रोजी भारत आणि पाकिस्‍तानमध्‍ये सुवर्णपदकासाठीचा सामना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT