Shreyas Iyer : रोहित शर्मा अव्वल! श्रेयसने टाकले सूर्यकुमारला मागे; इंग्लंडमधील T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-१० भारतीय

इंग्‍लंडमध्‍ये सर्वाधक धावा करणार्‍या फलंदाजांच्‍या यादीत पटकावले तिसरे स्‍थान
Shreyas Iyer T20I Record vs England
Shreyas Iyer T20I Record vs EnglandPudhari
Published on
Updated on

Shreyas Iyer T20I Record vs England : श्रेयस अय्यरने इंग्लंडविरुद्ध ४ सामन्यांत १९० धावा केल्या असून, टी २० क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने तिसरे स्थान पटकावले आहे. यादरम्यान त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. सूर्यकुमार यादवने इंग्‍लंडमध्‍ये ३ डावात १७१ धावा केल्या होत्या.

फलंदाज म्‍हणून कर्णधार श्रेयस अय्‍यरचे यश लक्षणीय

श्रेयस अय्यर भलेही कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये चांगल्या निकालासाठी संघर्ष करत असेल, पण एक फलंदाज म्हणून तो येथे कमालीचा यशस्वी ठरला आहे. श्रेयस अय्यरने इंग्लंडविरुद्धच्या गेल्या ४ सामन्यांत २ अर्धशतकांच्या मदतीने १९० धावा केल्या आहेत, तर या सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट १५५.७३ चा राहिला आहे. या १९० धावांच्या जोरावर तो इंग्लंडच्या भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात (T20I) भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Shreyas Iyer T20I Record vs England
India vs Ireland T20 : अभिषेक शर्मा 'टॉप'ला! सूर्यकुमार यादवचे दोन रेकॉर्ड मोडित

श्रेयस अय्यरने टाकले सूर्यकुमार यादवला मागे

श्रेयसने इंग्लंडविरुद्ध ४ सामन्यांत १९० धावा केल्या आहेत. तो टी २० क्रिकेटमध्‍ये इंग्‍लंड भूमीवर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. सूर्यकुमार यादवने ३ डावात १७१ धावा केल्या होत्या आणि आता तो चौथ्या स्थानावर घसरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. राहितने इंग्‍लंड १२ डावात एकूण ३३५ धावा केल्या आहेत, तर दुसऱ्या स्थानावर विराट कोहली असून त्‍याने टी २० फॉर्मेटमध्‍ये इंग्लंडमध्ये ७ डावात एकूण १९२ धावा केल्या आहेत.

Shreyas Iyer T20I Record vs England
Shreyas Iyer ENG vs IND: वाईट खेळलो; ही २०० धावांची खेळपट्टी नव्हती... कर्णधार श्रेयसनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

पाचव्‍या स्‍थानावर धोनी आणि युवराज सिंग

इंग्लंडच्या भूमीवर T20I मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर संयुक्तपणे एमएस धोनी आणि युवराज सिंह आहेत. धोनीने ८ डावात १५३ धावा केल्या होत्या, तर युवराजने ५ डावात १५३ धावा केल्या होत्या. या यादीत गौतम गंभीर सहाव्या स्थानावर असून त्याने ५ डावात १४८ धावा केल्या आहेत, तर अभिषेक शर्मा ४ डावात १२८ धावांसह सातव्या स्थानावर आहे. या यादीत दहाव्या स्थानावर सुरेश रैना आहे, ज्याने ७ डावात १०५ धावा केल्या होत्या.

Shreyas Iyer T20I Record vs England
IND vs IRE: आयर्लंडकडून भारताचा लाजिरवाणा पराभव; 'या' 5 खेळाडूंनी टीम इंडियाची लाज काढली, एका खेळाडूला तर...

इंग्लंडमध्ये T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-१० भारतीय फलंदाज, कंसात डाव आणि धावा

  • रोहित शर्मा (१२ – ३३५)

  • विराट कोहली (७ – १९२ )

  • श्रेयस अय्यर ( ४ – १९०)

  • सूर्यकुमार यादव (३ – १७१)

  • एमएस धोनी – (८ – १५३)

  • युवराज सिंह ( ५ – १५३)

  • गौतम गंभीर ( ५ – १४८)

  • अभिषेक शर्मा (४ – १२८)

  • केएल राहुल ( ३ – १२६)

  • हार्दिक पंड्या ( ४ – १०८)

  • सुरेश रैना ( ७ – १०५)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news