Shikhar Dhawan Marriage pudhari photo
स्पोर्ट्स

Shikhar Dhawan Marriage: शिखर धवन दुसऱ्यांदा करणार लग्न, सेलिब्रेटींची मांदीआळी; मात्र पत्नी कोण असणार?

या लग्नाची तयारी आधीपासूनच सुरू झाली आहे.

Anirudha Sankpal

Shikhar Dhawan 2nd Marriage: भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनच्या घरी दुसऱ्यांना सनई चौघडे वाजणार आहेत. शिखर धवन आपली गर्लफ्रेंड आणि आयर्लंडच्या सोफी शाईन हिच्यासोबत लवकरच लग्न करणार आहे. हे दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत.

हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार फेब्रुवारी महिन्यात दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. यासाठी दिल्ली एनसीआरमध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. यात क्रिकेट जगतातील अन् बॉलीवूडमधील अनेक स्टार सामील होणार आहेत. या लग्नाची तयारी आधीपासूनच सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या दोघांसाठीही ही एक नवी सुरूवात असणार आहे. त्यामुळं ते दोघेही खूश आहेत. लग्नाच्या तयारीत शिखर धवन स्वतः जातीनं लक्ष घालत आहे. त्याला लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये काही कमी पडू नये असं वाटतं.'

कोण आहे सोफी शाईन?

सोफी एक आयरीश प्रोडक्ट कंसल्टंट आहे. तिची प्रोफेशनल बॅकग्राऊंड चांगली आहे. तिच्याकडे लिमरिक इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची मार्केटिंगची डिग्री आहे. तिने आयर्लंडच्या कॅसलरॉय कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. सध्या ती अबू धाबी युएई इथं नॉर्दन ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये व्हाईस प्रेसिडेंट पदावर आहे. ती फारशी प्रकाशझोतात रहात नाही. मात्र तरी देखील तिच्या स्टायलिश लूक अन् फोटोंची चर्चा असते.

चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान दिसले होते एकत्र

शिखर धवन आणि सोफी शाईन हे चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबात चर्चांना ऊत आला होता. शिखर धवन २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत स्टँडमध्ये शाईन सोबत दिसला होता. यानंतर ते वेळोवेळी सोशल मीडियावर एकमेकांसोबत दिसले होते. यावेळी त्यांनी संकेत देत आपले रिलेशनशिप कन्फर्म केलं होतं.

मैत्री बदलली प्रेमात

मिळालेल्या माहितीनुसार शिखर अन् सोफी यांची भेट काही वर्षापूर्वी दुबईत झाली होती. दोघे पहिल्यांदा मित्र झाले. त्यानंतर ही मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली. यानंतर आयपीएल २०२४ मध्ये सोफी अनेकवेळा दिसली.

शिखर धवनचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियन इंडियन आएशासोबत लग्न केलं होतं. त्यांना जोरावर हा मुलगा देखील आहे. धवनने त्याच्यापेक्षा १० वर्षाने मोठ्या आएशा सोबत लग्न केलं होतं. आएशा ही किक बॉक्सर आहे. शिखरने २०१२ मध्ये लग्न केलं होतं. मात्र २०२१ मध्ये आएशा आणि धवन हे एकमेकांपासून वेगळे झाले. २०२३ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT