Shaheen Afridi PSL pudhari
स्पोर्ट्स

Shaheen Afridi PSL: शाहीन अफ्रिदी अन् सिकंदर रजावर गंभीर आरोप... अनोळखी व्यक्तींना 'जबरदस्ती'ने खेळाडूंच्या रूममध्ये नेलं

Anirudha Sankpal

Shaheen Afridi PSL Controversy: पाकिस्तान सुपर लीग २०२६ चा हंगाम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लाहोर कलंदर यावेळी थेट रडारवर असून संघाचा कर्णधार शाहीन शाह अफ्रिदी आणि अष्टपैलू खेलाडू सिकंदर रजा या दोघांवर गंभीर आरोप झाले आहेत.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लाहोर कलंदरचा कर्णधार शाहीन आणि सिकंदर रझा यांनी नियमाचा भंग केला आहे. त्यांनी सुरक्षा नियमांची पायमल्ली करत चार अनधिकृच अनोळखी व्यक्तींना खेळाडूंच्या हॉटेलमध्ये खेळाडूंच्या रूम असलेल्या प्लोअरपर्यंत नेलं. इतकंच नाही तर त्यांनी बळजबरीने या व्यक्तींना रूममध्ये नेलं.

विरोध केला तरी ऐकलं नाही

मिळालेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरणं त्यावेळी उजेडात आलं ज्यावेळी हॉटेलमध्ये थांबलेल्या इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने थेट सुरक्षेलाच सुरूंग लागला. पोलिसांनी सांगितलं की सलमान नसीर यांनी लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे लिहिलं आहे की व्हिजिटर्सना परवानगी नाही. इतकंच नाही तर संघाच्या लायजन ऑफिसरची विनंती देखील दोनवेळा रद्द करण्यात आली आहे. असं असलं तरी शाहीन आणि रझाने ड्युटीवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विरोधानंतरही आपल्या अनोळखी गेस्ट्सना आज प्रवेश दिला. ते तिथं तीन तास थांबले होते.

कडक कारवाईची मागणी

सुरक्षा दलांनी या घटनेला प्रोटोकॉलचे स्पष्ट उल्लंघन असं सांगितलं आहे. पंजाब पोलिसींनी लीगच्या आयोजकांकडे या घटनेची दखल घेत भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कडक करावाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी लाहोर कलंदर्सकडून अजूनपर्यंत अधिकृत असं वक्तव्य आलेलं नाही. मात्र सामन्यानंतर सिकंदर रझाने स्पष्टीकरण देत हे लोकं त्यांच्या कुटुंबातील आणि जवळचे दोस्त होते असं सांगितलं. रझाने शाहीनला क्लीन चीट देत शाहीन हा फक्त माझी मदत करत होता. या सर्व घटनेची जबाबदारी माझी आहे मी त्या सर्वांना खूप आधीपासून ओळखतो.

सुरक्षेच्या कारणास्तव क्लोज डोअर सामने

दरम्यान, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यापूर्वी देखील कडक भूमिका घेतली आहे. लीगच्या सुरूवातीचे सामने हे क्लोज डोअर झाले आहेत. जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हॉटेल आणि मैदानावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

यापूर्वी नसीम शाहला देखील शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली होती. यावरून सुरक्षा दल यंदाच्या पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये कोणतीही ढील न देण्याच्या मूडमध्ये नसल्याचे दिसून येतं. आता पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये हा मुद्दा कुठंच वळण घेते हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT