Sanju Samson T20 World Cup 2026 pudhari photo
स्पोर्ट्स

Sanju Samson T20 World Cup 2026: सोशल मीडिया, फोन, साखर अजिबात नाही.... संजूनं सांगितली त्याच्या कॅमबॅकची कहानी

Anirudha Sankpal

Sanju Samson T20 World Cup 2026: टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये अवघे ४ सामने खेळणाऱ्या संजू सॅमसनने भारताला ज्या सामन्यात अत्यंत गरज होती त्या सामन्यात मोठी खेळी केली. सेमी फायनल गाठण्यासाठी महत्वाच्या वेस्ट इंडीजविरूद्धच्या आणि इंग्लंडविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात पाठोपाठ अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाला फायनल गाठण्यात मदत केली.

जेवढा आवाज कमी तेवढं...

संजू सॅमसनने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात ८९ धावांची दमदार खेळी करत भारताला २५३ धांवांपर्यंत मजल मारून दिली. त्याच्या या खेळीनंतर देशभरातून त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. मात्र ज्यावेळी वर्ल्डकप सुरू झाला त्यावेळी तो प्लेईंग ११ मध्ये बसत नव्हता. स्पर्धेपूर्वी त्याचा फॉर्म चांगला नव्हता त्यामुळं त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळाली नाही. मात्र अभिषेक शर्माची खराब कामगिरी अन् काही खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे संजूला संधी मिळाली. त्यानं संधीचं सोनं केलं.

संजू मधील हा बदल होण्यामागं त्याचा मोठा त्याग देखील आहे. इंग्लंडविरूद्धचा सामना झाल्यानंतर संजूनं प्रतिक्रिया देताना यााबबत माहिती दिली. संजू म्हणाला, 'माझ्या कठिण काळात मी ज्या व्यक्तींवर सर्वात जास्त प्रेम करतोय ते माझ्या सोबत उभे होते. मी माझे सर्व दरवाजे बंद केलं. मी फोन बंद केला, मी सोशल मीडिया सोडला, मी आताही सोशल मीडियावर नाहीये. जितका कमी आवाज, लोकांशी कमी संभाषण तितकं लक्ष केंद्रित करणं सोपं.'

संजू पत्रकार परिषदेत पुढे म्हणाला, 'माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला क्षण सध्या सुरू आहे. मी खरोखरच खूप कृतज्ञ आहे. अनेक वर्षांपासून मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं होतं, मी खूप संयमाने याची वाट पाहत होतो, मी खूप हार्ड वर्क केलं. मी खूप अनलकी ठरलो आहे. मात्र कधी कधी लक काम करून जातं.'

सामन्यात काय झालं?

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २५३ धावांचा डोंगर उभारला. यात संजूच्या ८९, इशान किशनच्या ३९, शिवम दुबेच्या ४३ धावांचे मोठे योगदान होते. त्याचबरोबर हार्दिक पांड्याने १२ चेंडूत २७ तर तिलक वर्माने ७ चेंडूत २१ धावा ठोकल्या.

भारताच्या २५३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने देखील २४६ धावांपर्यंत मजल मारत सामना रंगतदार केला. मात्र जसप्रीत बुमराहने टिच्चून मारा करत भारताचा विजय निश्चित केला. त्याने ४ षटकात फक्त ३१ धावा देत १ विकेट घेतली. इंग्लंडकडून जेकब बेथेलने शतकी खेळी करत ४८ चेंडूत १०५ धावा ठोकल्या. विल जॅक्सने २० चेंडूत ३५ धावा ठोकून त्याला चांगली साथ दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT