Rohit Sharma India Vs Australia 2nd ODI :
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना हा अॅडिलेडवर २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतानं पहिला सामना गमावल्यामुळं दुसरा सामना जिंकून मालिकेतील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघानं कंबर कसली आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला संघ व्यवस्थापनानं ऐच्छिक सराव सत्राचा आयोजन केलं होतं. या सत्रात माजी कर्णधार रोहित शर्मानं सहभाग नोंदवला होता.
रोहित शर्माने या सराव सत्रात नेट्समध्ये फलंदाजी केली. त्यानं चांगलाच घाम गाळला. मात्र यादरम्यान रोहित शर्माची बॉडी लँग्वेज सहज नव्हती. सरावावेळी पूर्वीसारखा रोहित शर्मा जाणवत नव्हता. याचबरोबर सराव संपवून हॉटेल रूममध्ये परतत असताना देखील रोहित शर्माची बॉडी लँग्वेज ही पूर्वीसारखी नव्हती. त्यातच संघाचा कोच गौतम गंभीर आणि मुख्य प्रशिक्षक अजित आगरकर यांनी यशस्वी जैस्वालसोबत दीर्घ चर्चा केली. यशस्वी जैस्वाल हा संघात सेकंड ओपनिंग बॅट्समन आहे. त्याच्याकडे रोहितची रिप्लेसमेंट म्हणून पाहिलं जातं.
रेव्हस्पोर्ट्सनं दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्माचा मूड हा ऑफ होता. तो सरावावेळी पूर्वीसारखा सहज नव्हता. रोहित शर्मा हा सहसा माध्यमांसोबत बोलतो. चाहत्यांसोबत देखील तो मिळून मिसळून असतो. त्याच्या चेहऱ्यावर कायम हास्य असतं. मात्र दुसऱ्या सामन्यापूर्वीच्या सरावानंतर रोहित शर्माच्या चेहऱ्यावर चिंतेची रेष दिसत होती.
नेट सेशन झाल्यानंतर रोहित शर्मा हा एकटाच चालत जाताना दिसला. दुसरीकडं आगरकर, शिव सुंदर दास आणि कोच गंभीर हे यशस्वी जैस्वालसोबत चर्चा करताना दिसत होते. त्यामुळं दुसऱ्या वनडे सामन्यात काहीतरी मोठं होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. भारतीय वनडे संघ सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. रोहितनंतरच्या युगाची एक झलक असू शकते.
ज्यावेळी अजित आगरकर यांनी भारतीय वनडे संघाचा पुढचा कर्णधार हा शुभमन गिल असेल असं सांगितलं. त्यावेळी रोहित शर्माला वनडे कॅप्टन्सी सोडायची नव्हती असा दावा करणारी वृत्त झळकली होती. त्यामुळं नेतृत्वबदल हा स्वतःहून घेतलेला निर्णय नसून तो रोहितवर लादला गेल्याची चर्चा सुरू झाली. रोहित शर्माला वनडेमध्ये नेतृत्व करायचं होतं. सध्याचा काळ हा रोहित शर्मासाठी परीक्षेचा काळ नक्कीच असेल.