Rohit Sharma ODI Retirement pudhari
स्पोर्ट्स

Rohit Sharma ODI Retirement: आता निवृत्तीच.. रोहितनं चिडून निर्णय घेतला होता! मात्र लॉर्ड्स सामन्यापूर्वी अचानक असं काय झालं?

Anirudha Sankpal

Rohit Sharma ODI Retirement: इंग्लंड दौऱ्यावर असताना रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्ण विराम लागणार होता. लॉर्ड्समध्ये झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यापूर्वी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. रोहित शर्माचा लॉर्ड्सवरील सामना हा शेवटचा सामना असणार अशी ती बातमी होती. रोहित शर्मा यापूर्वीच कसोटी आणि टी २० क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळं आता त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपुष्टात येणार अशी स्थिती निर्माण झाली होती.

मात्र त्यावेळी बीसीसीआय सचिव जेवजीत सैकिया यांनी या वृत्ताचं खंडन करत रोहित निवृत्त होणार नाही असे सांगितलं होतं. रोहितने देखील लॉर्ड्सवर शतकी खेळी करत आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं होतं. रोहितने लॉर्ड्सवर १३८ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. वनडेमध्ये लॉर्ड्सवर शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला होता.

रोहित निवृत्तीसाठी तयार होता

दरम्यान, आता पीटीआयने दिलेल्या एका वृत्तानुसार रोहित शर्माला एका निवडसमिती सदस्याने याबाबतचा निरोप दिला होता. निवडसमिती चेअरमन यांनी रोहितला हा निरोप दिला नाही. त्यांनी निवडसमितीने आता आम्ही भविष्याकडे पाहत आहोत असं सांगितलं होतं. याचा अर्थ आता रोहित निवडसमितीच्या स्कीमचा भाग नव्हता. रोहितला तू इंग्लंड दौऱ्यावेळी लॉर्ड्समध्ये वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार का अशी देखील विचारणा करण्यात आली होती.

मात्र भारताच्या या वरिष्ठ फलंदाजाने आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींनी याबाबत गप्प राहणंच पसंत केलं. मात्र आता आलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा त्या दिवशी रागात होता अन् तो निवृत्ती जाहीर करण्याच्या तयारीत होता.

अखेर बीसीसीआय सचिवांचे स्पष्टीकरण

बीसीसीआय सचिव सैकिया यांनी, 'रोहित शर्माच्या भविष्याबाबत माध्यमांमध्ये जे काही सुरू आहे त्याबाबत मी सांगू इच्छितो की रोहितबाबत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. रोहित भारतीय वनडे संघाचा नियमीत सदस्य असून तो जोपर्यंत संघात आहे तोपर्यंत तो देशाचे प्रतिनिधित्व करणार. दुसऱ्या शब्दात तो लॉर्ड्स सामन्यांतर वनडेमधून निवृत्त होणार नाही.'

रोहितच्या नावावर पुन्हा चर्चा?

बीसीसीआयने नुकतेच एक रिव्ह्यू मिटिंग घेतली. त्यात भारतीय संघाचे दोन्ही कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर, कोच गौतम गंभीर, निवडसमिती चेअरमन अजित अगरकर बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांची समावेश होता. या वर्षाच्या सुरूवातीला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर संघाच्या झालेल्या खराब कामगिरीवर तसेच वनडे वर्ल्डकपच्या रोडमॅपबाबत चर्चा झाली.

या बैठकीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांचा पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये समावेश असणार की नाही याची गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा सुरू आहे. विराट कोहली आणि जडेजावर लगेच टांगती तलवार नाहीये. मात्र रोहित शर्मा खेळेल की नाही याबाबत खात्री देता येत नाहीये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT