Riyan Parag Youtube Search 
स्पोर्ट्स

Riyan Parag : रियान परागची यूट्यूब हिस्ट्री व्हायरल; ‘या’ अभिनेत्रींचे हॉट फोटो करतो सर्च

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागने (Riyan Parag) आयपीएल २०२४ मध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्याने ५०० हून अधिक धावा केल्या. अनेक हंगामात अपयशी ठरणारा रियान या वर्षी संघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज ठरला. पण आयपीएल संपल्यानंतर रायन वादात सापडला आहे. त्याची यूट्यूब सर्च हिस्ट्री लिक झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सर्च हिस्ट्री कशी समोर आली?

२२ वर्षीय रियान पराग (Riyan Parag) यूट्यूबवर स्ट्रीमिंग करतो. त्याने गेमिंग सत्रादरम्यान यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम सुरू केले होते. त्यावेळी तो फ्री म्युझिक सर्च करत होता. रियान त्याची स्क्रीन बंद करायला विसरल्याने त्याचवेळी त्याची सर्च हिस्ट्री दिसू लागली. जेव्हा त्याने म्युझिक सर्च केले तेव्हा आधीचे अनेक कीवर्ड दिसू लागले. यामध्ये सारा अली खान हॉट आणि अनन्या पांडे हॉट असे कीवर्ड दिसू लागले. हे स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका एक्स यूजरने रायनचा हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याने कॅप्शनमध्ये 'रियान परागची सर्च हिस्ट्री "सारा अली खान हॉट" "विराट कोहली" "अनन्या पांडे हॉट," असे लिहिले आहे.

रियान याआधीही वादात

राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज रियान पराग (Riyan Parag) त्याच्या स्फोटक कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. परागने १५ आयपीएल सामन्यांमध्ये ५२.०९ च्या सरासरीने आणि १४९.२२ च्या स्ट्राइक रेटने ५७३ धावा केल्या आहेत. या काळात ४ अर्धशतकेही झळकावली. रियानच्या या कामगिरीमुळे टीम इंडियामध्ये त्याची निवड होण्याची शक्यता आहे. मात्र याआधीही रियान पराग अनेकदा वादात सापडला आहे. आयपीएलदरम्यान तो मैदानावर विचित्र हालचाली करताना दिसला होता. त्यावेळीही त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. यासोबतच परागला सोशल मीडियावर अश्लील पोस्टसाठीही सतत टार्गेट केले जात होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT