राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार रियान पराग आयपीएल सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट (व्हेपिंग) ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला होता.  Pudhari
स्पोर्ट्स

Riyan Parag Controversy | ड्रेसिंग रूममध्ये 'व्हेपिंग' करणे पडले महागात; रियान परागला मोठा दंड

Riyan Parag Controversy | मॅच रेफरीही रडारवर, BCCI मोठी कारवाई करणार?

पुढारी वृत्तसेवा

Riyan Parag E-cigarette controversy

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार रियान पराग आयपीएल सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट (व्हेपिंग) ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याच्या खात्यात एक 'डिमेरिट पॉइंट' (दोष गुण) नोंदवण्यात आला आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

रियान परागने केले आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन

मुल्लानपूर येथे झालेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावादरम्यान ही घटना घडली. थेट प्रक्षेपणावेळी (Live Broadcast) रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये 'व्हेपिंग' (ई-सिगारेट) करताना दिसला होता. ही कृती "खेळाची प्रतिष्ठा मलीन करणारी" मानली गेली असून, आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२१ अंतर्गत (लेव्हल १ चा गुन्हा) ही कारवाई करण्यात आली आहे.आयपीएलने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, "रियान परागने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात तो ड्रेसिंग रूममध्ये 'व्हेप' वापरताना दिसल्याने ही कारवाई करण्यात आली."

परागने मान्य केली चूक

रियान परागने आपली चूक मान्य केली असून सामना पंच अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, 'लेव्हल १' च्या गुन्ह्यासाठी औपचारिक सुनावणीची गरज नसते; यामध्ये २५ टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट दिला जातो.

राजस्थानची दमदार कामगिरी, कर्णधार रियान पराग कामगिरी निराशाजनक

राजस्थान रॉयल्ससाठी हा आयपीएल हंगाम आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. त्यांनी ९ पैकी ६ सामने जिंकले असून १२ गुणांसह ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र, कर्णधार रियान परागची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्याने ९ सामन्यांत केवळ १४.६२ च्या सरासरीने आणि १२४.४६ च्या स्ट्राईक रेटने फक्त ११७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

मॅच रेफरीही रडारवर

या प्रकरण[ आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मॅच रेफरीवर कारवाई करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रेसिंग रूममध्ये प्रतिबंधित वस्तू विनापास किंवा विना तपासणी पोहचू दिल्याने खेळाची बदनामी झाली असून, यासाठी मॅच रेफरीला जबाबदार धरले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT