स्पोर्ट्स

Rashid Khan Record : राशिद खानने रचला इतिहास! ‘असा’ कारनामा करणारा बनला दुसरा आशियाई कर्णधार

राशिदने केवळ 98 सामन्यांत 165 बळी घेण्याची किमया केली आहे

रणजित गायकवाड

rashid khan new record became second asian captain to take 50 wickets in t20i cricket

शारजा : अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर राशिद खानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. तो आता सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने न्यूझीलंडच्या टिम साउदीला मागे टाकून हा विक्रम आपल्या नावावर केले आहे. साउदीने 126 सामन्यांमध्ये 164 बळी घेतले होते, तर राशिदने केवळ 98 सामन्यांत 165 बळी घेण्याची किमया केली आहे.

सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय बळी घेणारे गोलंदाज :

राशिद खान : 165 बळी

टिम साउदी : 164 बळी

ईश सोढी : 150 बळी

शाकिब अल हसन : 149 बळी

मुस्तफिजुर रहमान : 142 बळी

हे यश राशिदने शारजा येथे संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मिळवले. या सामन्यात त्याने 4 षटकांत 21 धावा देऊन 3 बळी घेतले.

कर्णधार म्हणूनही नवा विक्रम

या सामन्यात राशिदने कर्णधार म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले. असा पराक्रम करणारा तो जगातील पाचवा कर्णधार ठरला आहे. या आधी केवळ चार कर्णधारांनी 50 किंवा त्याहून अधिक बळी घेतले होते. या कामगिरीमुळे, टी-20 क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो दुसरा आशियाई कर्णधार ठरला आहे. कुवेतचा मोहम्मद अस्लम या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने कर्णधार म्हणून 76 बळी घेतले आहेत.

टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज :

83 बळी : चार्ल्स पर्चर्ड (जर्सी)

76 बळी : मोहम्मद असलम (कुवेत)

58 बळी : क्लिंटन रुबागुम्या (रवांडा)

54 बळी : गेरहार्ड इरास्मस (नामिबिया)

52 बळी : राशिद खान (अफगाणिस्तान)

टी-20 क्रिकेटमध्येही अव्वल स्थान

केवळ आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर एकूणच टी-20 क्रिकेटमध्येही राशिद खान सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. जगभरातील विविध लीगमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवून दिली आहे. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याने टी-20 क्रिकेटमध्ये ६६४ बळी घेतले आहेत, आणि आगामी काळात तो 1000 बळींचा टप्पाही गाठू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT