Anvay Dravid Selected In Team India: बीसीसीआयने नुसतेच भारताच्या १९ वर्षाखालील पुरूष संघांची घोषणा केली आहे. हा संघ श्रीलंकेविरूद्ध मालिका खेळणार आहे. या संघाचे नेतृत्व यशवर्धन सिंह चौहानकडे देण्यात आलं आहे. तर लक्ष्य रायचंदानी यांची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. या १५ सदसीय संघात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याची देखील निवड झाली आहे.
श्रीलंकेत होणाऱ्या ५ सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याची १९ वर्षाखालील भारतीय संघात निवड झाली आहे. राहुल द्रविडचा हा धाकटा मुलागा असून त्याची वनडे संघात निवड झाली आहे.
वडिलांप्रमाणेच अन्वय देखील विकेटकिपर बॅटर आहे. अन्वयची नोव्हेंबर २०२५ मध्ये देखील भारताच्या १९ वर्षाखालील ब संघात निवड झाली होती. त्यावेळी या संघाने अफगाणिस्तानविरूद्धच्या १९ वर्षाखालील संघाविरूद्ध ट्राय सिरीज खेळली होती.
या मालिकेत भारताच्या १९ वर्षाखालील अ संघाचा देखील समावेश होता. ही एकदिवसीय मालिका होती. १७ वर्षाच्या अन्वयची आता भारताच्या १९ वर्षाखालील मुख्य संघात निवड झाली आहे. मात्र त्याची कसोटी संघात निवड झालेली नाही.
गेल्या वर्षी विनू मंकड ट्रॉफीसाठी अन्वयची कर्नाटकच्या संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली होती. त्यानंतर तो विजय मर्चंड ट्रॉफीमध्ये देखील खेळला होता. आता त्याची भारतीय संघात निवड झाली असून तो तीन आठवड्यांच्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा ४ जुलै पासून २३ जुलैपर्यंत असणार आहे. यात तीन ठिकाणी ५ सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), यशवर्धन सिंह चौहान (कर्णधार), विनीज व्हीके, अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल, अन्वय द्रविड, अनमोलजीत सिंह, वुतकुरी यशवीर गौड, रोहित अनिल यादव, शवीन व्ही, काव्य प्रकाश पटेल, मोहित उलवा, इशान सूद