पंजाब किंग्जची सह-मालकीण प्रीती झिंटा हिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.  (source- instagram)
स्पोर्ट्स

Preity Zinta Emotional Post | IPL फायनल हरल्यानंतर प्रीती झिंटाची भावूक पोस्ट; ''काम अपूर्णच, पुढच्या वर्षी...''

प्रीती झिंटाने तिच्या टीममधील खेळाडूंबद्दल अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत...

दीपक दि. भांदिगरे

Preity Zinta Emotional Post

आयपीएलच्या अंतिम सामन्यात (IPL 2025) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (Royal Challengers Bengaluru) पंजाब किंग्जला (Punjab Kings) हरवत आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे विराट कोहलीने १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली. दरम्यान, आयपीएल संपल्यानंतर तीन दिवसांनी पंजाब किंग्जची सह-मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) हिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने ''जे तिला अपेक्षित होते ते झाले नाही. पण मला माझ्या टीमचा अभिमान आहे'', असे तिने म्हटले आहे. प्रीतीने तिच्या टीममधील खेळाडूंबद्दल अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तिची टीम का हरली? हेदेखील याचादेखील तिने खुलासा केला आहे.

''आम्हाला जसा हवा होता तसा शेवट झाला नाही पण....प्रवास अभूतपूर्व होता! तो रोमांचक, मनोरंजक आणि प्रेरणादायी होता. आमच्या तरुण टीमने, आमच्या सिंहांनी संपूर्ण स्पर्धेत केलेली झुंजार खेळी आणि धैर्य मला खूप आवडले. आमचा कॅप्टन, आमचे सरपंच यांनी फ्रंटवरून नेतृत्व कसे केले? आणि या आयपीएलमध्ये भारतीय अनकॅप्ड खेळाडूंनी ज्या प्रकारे वर्चस्व गाजवले, हे तर मला खूप आवडले!,'' असे प्रीती झिंटाने म्हटले आहे.

''हे वर्ष खूप अनोखे होते. आयपीएलदरम्यान दुखापत आणि राष्ट्रीय कर्तव्यामुळे महत्त्वाच्या खेळाडूंविना टीम खेळली. तरीही आम्ही विक्रम मोडले. स्पर्धेदरम्यान काही काळ थांबलो. घरच्या मैदानावरील सामने इतर राज्यांत खे‍ळवले गेले आणि एक स्टेडियम रिकामे केले! आम्ही या परिस्थितीशी जुळवून घेतले आणि तब्बल एका दशकानंतर पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले. एका रोमहर्षक अंतिम सामन्यात अखेरपर्यंत लढलो. आमच्या सपोर्ट स्टाफचे आणि पीबीकेएसमधील सर्वांचे या अविश्वसनीय हंगामासाठी खूप खूप आभार.'' असे तिने नमूद केले आहे.

पुन्हा स्टेडियममध्ये भेटू...

मी आश्वासन देतो की, आम्ही पुन्हा एकत्र येऊ. कारण काम अपूर्णच राहिले आहे. पुढच्या वर्षी स्टेडियममध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम...!, अशा शब्दांत प्रीतीने टीममधील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT