Virat Kohli RCB Captaincy pudhari
स्पोर्ट्स

Virat Kohli RCB Captaincy: आरसीबी विराटला काढून मला कर्णधार करणार होती... पार्थिव पटेलचा दावा; सांगितली 'अंदर की बात'

पार्थिव पटेलने त्याला आरसीबीचा कर्णधार करण्यात येणार होतं. मात्र पुढच्या वर्षी संघ नेतृत्वात कोणताही बदल झाला नाही.

Anirudha Sankpal

Virat Kohli RCB Captaincy Parthiv patel : भारताचा माजी खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडून खेळलेल्या पार्थिव पटेलने एक वेळ अशी होती की आरसीबी विराट कोहलीला कॅप्टन्सीवरून कमी करणार होती असा धक्कादायक दावा केला आहे. असेच वक्तव्य इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने देखील दिले होते.

पार्थिव पटेलने हे देखील सांगितलं की त्याला आरसीबीचा कर्णधार करण्यात येणार होतं. मात्र पुढच्या वर्षी संघ नेतृत्वात कोणताही बदल झाला नाही. उलट ज्याने पार्थिव पटेलला कॅप्टन्सीची ऑफर दिली होती त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवला होता. पार्थिव पटेल त्या हंगामात एकही सामना खेळला नाही.

कोणी दिली होती ऑफर?

पार्थिव पटेलने माजी खेळाडू आकाश चोप्रासोबत एक पॉडकास्ट केला होता. आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांनी सांगितलं की पार्थिव तू पुढच्या हंगामात विराटच्या जागी कर्णधार होणार आहे. नेहरा २०१८ आणि २०१९ मध्ये आरसीबीचा बॉलिंग कोच होता. गॅरी कर्स्टन हेड कोच होते. २०१९ च्या हंगामात आरसीबी पॉईंट टेबलमध्ये तळात होती. त्यानंतर या दोघांनाही पदावरून हटवण्यात आलं होतं. २०२० मध्ये माईक हेसन आणि सायमन कॅटीच यांनी सूत्रे हातात घेतली अन् सगळं चित्रच बदललं.

ज्यांनी ऑफर दिली त्यानांच डच्चू

पार्थिव पटेलने सांगितलं की मोईन अली देखील कॅप्टन्सीच्या रेसमध्ये होता. मात्र ही रेस पार्थिव पटेलने जिंकली. पार्थिव म्हणाला, 'मी याबाबत कधी बोललो नाही. मात्र मोईनने एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. मला सांगण्यात आलं होतं की पुढच्या वर्षी कॅप्टन्सीबाबत विचार करतोय तयार रहा.'

पार्थिव पुढे म्हणाला, 'पुढच्या वर्षी ज्या दोन लोकांनी मला ऑफर दिली होती त्यांनाच बदलण्यात आलं. नवीन कोच आले, त्या हंगामात मला एकही सामना खेळवण्यात आला नाही.'

दोन वर्षात विराटनेही सोडलं कर्णधारपद

पार्थिव पटेलला २०२० च्या आयपीएल हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. विकेट किपिंगची जबाबदारी एबी डिव्हिलियर्सने सांभाळली होती. त्याच्या जागी देवदत्त पडिक्कल खेळला होता. या हंगामात आरसीबी पुन्हा एकदा प्ले ऑफमध्ये गेली. पार्थिव पटेलने २०२० चा हंगाम संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. विराट कोहली २०२० मध्ये आरसीबीचा कर्णधार होता. २०२१ च्या हंगामानंतर त्याने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT