

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कामाची सुरुवात उत्साहाने होईल. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या. कुटुंबाची मदत मिळेल. विश्रांती महत्त्वाची.
वृषभ : स्थिरपणाच ताकद ठरेल. पैशांबाबत शहाणपणाने निर्णय घ्या. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. आनंदाची बातमी मिळेल.
मिथुन : नवीन संधी तुमच्यासमोर येतील. बोलताना शब्द जपून वापरा. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. प्रवासाचा योग.
कर्क : भावनिक निर्णय टाळणे हिताचे. कामात अतिरिक्त जबाबदारी येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
सिंह : तुमच्या प्रयत्नांना योग्य दाद मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत.
कन्या : कामाचे नियोजन केल्यास फायदा होईल. निर्णय घाईने घेऊ नका. कुटुंबासाठी वेळ देता येईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ : नातेसंबंधात गोडवा वाढेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. दिवस उत्साहात जाईल.
वृश्चिक : अडलेले काम मार्गी लागेल. स्पर्धेत तुमची बाजू मजबूत राहील. मित्रांकडून मदत मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.
धनू : नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. व्यवसायात लाभाची संधी आहे. आनंदाची बातमी मिळेल. प्रवासात काळजी घ्या.
मकर : मेहनतीचे फळ मिळेल. कामाचा ताण थोडा वाढू शकतो. बचतीकडे लक्ष देणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराची साथ मिळेल.
कुंभ : सर्जनशील विचारांना चालना मिळेल. नवीन संपर्क उपयोगी पडतील. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील.
मीन : मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. कामात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.