१० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत रमिता जिंदल हिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.  file photo
स्पोर्ट्स

Paris Olympics 2024 | भारताची रमिता जिंदल १० मीटर एअर रायफलमध्ये सातव्या स्थानी

नेमबाज रमिता जिंदलचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

पुढारी वृत्तसेवा

नेमबाजीत मनू भाकर हिने काल रविवारी कांस्य जिंकल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) सोमवारी भारताला नेमबाज रमिता जिंदल (Ramita Jindal) हिच्याकडून पदकाची आशा होती. पण सोमवारी (दि.२९) झालेल्या १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत रमिता जिंदल हिला १४५.३ गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पहिल्या फेरीत १०.२ गुण मिळवत रमिताने आश्वासक सुरुवात केली होती. पण रमिता जिंदल १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर राहिली. त्यानंतर पहिल्या ५ शॉट्समध्ये रमिता चौथ्या स्थानी राहिली. पण त्यानंतर ती सातव्या स्थानावर गेली. तिने पात्रता फेरीच्या ६ सीरीजमध्ये ६३१.५ गुण मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. पण अंतिम फेरीत तिला यश आले नाही.

पॅरिस ऑलिम्पिकच्या १० मीटर एअर रायफलमध्ये दक्षिण कोरियाच्या बान ह्यो-जीन हिने सुवर्णपदक तर चीनच्या हुआंग युटिंगने रौप्यपदक जिंकले. स्वित्झर्लंडच्या ऑड्री गोग्निएटने कांस्यपदक पटकावले.

रमिता जिंदलची कारकीर्द

रमिता जिंदल हिचा जन्म हरियाणा येथील लाडवा शहरात झाला होता. तिने स्थानिक शूटिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतल्यापासून तिचा शूटिंगचा प्रवास सुरू झाला. तिने २०२१ च्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले होते. २०२२ मध्ये तिने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. २०२२ मध्ये तिने आयएसएसएफ वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रमिताने दोन पदके जिंकली होती.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक २२ वर्षीय मनू भाकरने मिळवून दिले आहे. तिने रविवारी १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत कांस्य पदक जिंकले होते. आज ती पुन्हा एकदा सरबज्योत सिंग सोबत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत सहभागी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT