पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू याने पहिल्या फेरीतील सामना जिंकत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार सुरुवात केली होती. मात्र आता हा सामनच अवैध ठरविण्यात आला आहे. ( Paris Olympic 2024) जाणून घेवूया यामागील कारण..
बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत लक्ष्य सेन याने ग्वाटेमालाचा केविन कॉर्डन याचा 21-8, 22-20 असा पराभव केला होता. मात्र आता त्यांचा विजय अवैध ठरविण्यात आला आहे. कारण लक्ष्य सेनने ज्या खेळाडूला पराभूत केले होते तो दुखापतीमुळे ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर आहे. अशा स्थितीत आता लक्ष्यला पुन्हा सामना खेळावा लागणार आहे.
केविन कॉर्डन कोपरच्या दुखापतीमुळे बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला वगळल्यामुळे लक्ष्याचा विजयावर पाणी पडले आहे. या सामन्याचा निकाल ऑलिम्पिकमधून काढून टाकण्यात आला आहे. लक्ष्यला ग्रुप स्टेजचा पुढचा सामना बेल्जियमच्या ज्युलियन कारागीविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर तो इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध खेळेल. या गटात तीन सामने खेळणारा लक्ष्य हा एकमेव खेळाडू असेल.दुखापतीमुळे कॉर्डन बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडल्याने लक्ष्य हा या गटातील एकमेव खेळाडू असेल जो तीन सामने खेळेल तर इतर दोन खेळाडू जोनाथन क्रिस्टी आणि ज्युलियन कॅराघी हे बाद फेरी गाठण्यासाठी फक्त दोनच सामने खेळतील.