Pandya Brothers Rift pudhari
स्पोर्ट्स

Pandya Brothers Rift: पांड्या ब्रदर्समध्ये आलंय वितुष्ट... क्रुणालनं सलग दुसऱ्या वर्षी मिळवलं मोठं यश तरी हार्दिक 'गप्प' का?

Anirudha Sankpal

Pandya Brothers Rift IPL 2026: रॉयल चॅलेंजर बंगळुरूने गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. आरसीबीने गुजरातचा त्यांच्याच होम ग्राऊंडवर ५ विकेट्सनी पराभव करत हा इतिहास रचला. आरसीबी विजेता होताच खेळाडूंसह चाहत्यांनीही एकच जल्लोष केला. सोशल मीडियावर सर्वत्र या जल्लोषाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

मात्र या सर्व गर्दीत एक मोठी गोष्ट समोर येत आहे. आरसीबीच्या विजयात महत्वाचे योगदान देणाऱ्या क्रुणाल पांड्याने देखील सेलिब्रेशनचे फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. मात्र क्रुणालचा भाऊ हार्दिक पांड्याकडून क्रुणालचे कौतुक करणारी एक पोस्ट दिलेली नाही.

यामुळं सोशल मीडियावर क्रुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या यो दोन पांड्या बंधूंमध्ये वितुष्ट आलं आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. क्रुणालच्या यशावर हार्दिकने तोंडाला पट्टी लावणे अनेकांना रूचलेलं नाही. त्यामुळं चर्चांना उधाण अन् अफवांचा बाजार गरम झाला आहे.

जरी या चर्चा सुरू असल्या तरी क्रुणाल आणि हार्दिकमध्ये वितुष्ट आल्याचे कोणतेही अधिकृत वक्तव्य दोघांकडून किंवा कुटुंबियांकडून आलेले नाही. यापूर्वी देखील क्रुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आले होते. मात्र त्या अफवाच असल्याचे सांगत त्याचे खंडन करण्यात आले होते. क्रुणालने यापूर्वी देखील हार्दिकचे सार्वजनिकरित्या कौतुक आणि समर्थन करताना दिसला आहे.

क्रुणालचे आरसीबीच्या दुसऱ्या विजेतेपदामध्ये मोठे योगदान आहे. गेल्या वर्षी ज्यावेळी आरसीबीने पहिल्यांदा विजेतेपद पटकावलं होतं त्यावेळी हार्दिक पांड्याने क्रुणाल पांड्याचे अभिनंदन केलं होतं. त्यावेळी हार्दिक भावूक देखील झाला होता. त्याने यावेळी माझ्या डोळ्यात पाणी येत आहे तुझा अभिमान आहे अशी पोस्ट केली होती.

यामुळेच आरसीबीने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर हार्दिककडून कोणतीही पोस्ट न येणं चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळेच लोकं या दोघा भावांमध्ये सर्व काही ठीक आहे की नाही अशी विचारणा सोशल मीडियावर करत आहेत.

सध्याच्या घडीला फक्त सोशल मीडियावर पोस्ट न करणं हाच आधार मानून कोणत्याही निर्णयापर्यंत येणं घाईचं ठरेल. याबाबत अजून तरी दोन्ही भावांच्या जवळच्या लोकांकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळं सध्याच्या घडीला दोन भावांमधील वितुष्ट हा फक्त अंदाजच मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT