पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इमाद वसीम आणि त्याची पत्नी सानिया अशफाक.  X image
स्पोर्ट्स

Pakistani cricketer divorce | "माझ्‍या घराची राखरांगोळी झाली ..." : घटस्फोटावर पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पत्नीने सोडले मौन

इमाद वसीमने रविवारी केली होती घटस्‍फोटाची घोषणा, पत्‍नीने केले खळबळजनक आरोप

पुढारी वृत्तसेवा

  • पत्‍नी सानिया अशफाकने इन्‍स्‍टाग्रामवर केली भावूक पोस्‍ट

  • घटस्‍फोटासाठी एका महिलेला ठरवले जबाबदार

  • वैयक्तिक आयुष्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांना इमादने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

Pakistani cricketer divorce

इस्लामाबाद: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इमाद वसीम आणि त्याची पत्नी सानिया अशफाक यांचा विवाह अखेर मोडला आहे. इमादने रविवारी (२८ डिसेंबर) रात्री सोशल मीडियाद्वारे घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर, आता सानियाने या प्रकरणावर मौन सोडले आहे. "कोणालातरी माझ्या पतीशी लग्न करायचे होते," असा खळबळजनक आरोप करत तिने या घटस्फोटासाठी 'तिसऱ्या' व्यक्तीला जबाबदार धरले आहे.

'घराची राखरांगोळी झाली' : सानियाची भावनिक पोस्ट

सानिया अशफाक हिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत आपले दुःख व्यक्त केले. तिने म्‍हटलं आहे की, "मी हे सर्व अत्यंत जड अंतःकरणाने लिहीत आहे. माझे घर उद्‍ध्‍वस्‍त झाले आहे. माझ्या मुलांकडून त्यांचे वडील हिरावले गेले आहेत. मला तीन मुले आहे. यामध्‍ये एका पाच महिन्यांच्‍या बाळाचा समावेश आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्याच्या वडिलांनी त्याला आजपर्यंत साधे कुशीतही घेतले नाही. माझ्‍या घराची राखरांगोळी झाली "

तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप ठरला कारणीभूत

आपल्या वैवाहिक आयुष्यातील संघर्षावर भाष्य करताना सानिया म्हणाली, "प्रत्येक संसाराप्रमाणे आमच्यातही काही वाद होते; पण मी पत्नी आणि माता म्हणून कुटुंब टिकवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, एका तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे सर्व काही संपले. त्या व्यक्तीला माझ्या पतीशी लग्न करायचे होते आणि हेच आमच्या कमकुवत झालेल्या नात्यावर अखेरचे घाव ठरले."

कोण आहे इमाद वसीम?

इमाद वसीम याने डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दुसऱ्यांदा संन्यास घेतला. त्‍याने पाकिस्‍तानकडून ५५ एकदिवसीय आणि ७५ टी-२० सामने खेळले. त्‍याच्‍या नावावर १५४० धावा आणि ११७ विकेट आहेत. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तान संघात त्‍याचा समावेश होता. ऑगस्ट २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीचा संसार अवघ्या पाच वर्षांत मोडल्याने क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

दीर्घकाळ मतभेदामुळे घटस्‍फोटाचा निर्णय : इमाद वसीम

इमाद वसीमने घटस्फोटाची पुष्टी करताना सांगितले की, दीर्घकाळापासून सुरू असलेले मतभेद आणि वादांमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. इमाद सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) खेळण्यासाठी सिलहट येथे आहे. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडू, असे आश्वासन त्याने दिले आहे. तसेच, वैयक्तिक आयुष्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांना त्याने कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT