T20 World Cup 2026 pudhari photo
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026: सुपर ८ मध्ये पुन्हा पावसाचा खेळ... कुणाचा पत्ता होणार कट; पाकिस्तानचा खेळ खल्लास की...?

Anirudha Sankpal

T20 World Cup 2026 Super 8 : न्यूझीलंडविरूद्धचा पहिला सामना वॉश आऊट झाल्यानंतर आता पाकिस्तान इंग्लंडविरूद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र सुपर ८ मध्ये या सामन्याचं भवितव्य हे वरूणदेवाच्या कृपेवर अवलंबून आहे. इंग्लंडने आधीच श्रीलंकेचा पराभव करत २ गुण मिळवले आहेत.

मात्र पाकिस्तानसाठी इंग्लंडविरूद्धचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. त्यांना जर सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर हा सामना वॉश आऊट होऊन चालणार नाही. त्यामुळं पल्लिकेलेमधील ढगांकडे पाकिस्तान डोळे लावून बसला आहे.

अॅक्युवेदरनं दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड - पाकिस्तान सामन्यात २५ टक्के पावसाची शक्यता आहे. तर ढगाळ वातावरणाची शक्यता ४८ टक्के होती. रात्री पावसाची शक्यता २ टक्के इतकीच आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पावसाचा सामन्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. जी काही पावसाची शक्यता आहे ती सामना सुरू होण्यापूर्वी आहे.

पाकिस्तान इंग्लंड सामना?

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानचा फलंदाज साहीबझादा फरहान यानं माध्यमांना सांगितलं की, आमच्या फिरकीसमोर इंग्लंडची परीक्षा असणार आहे. जर पाकिस्ताननं हा सामना गमावला तर पाकिस्तानला श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यावर अवलंबून रहावं लागेल. तसेच इतर सामन्याच्या निकालावर देखील अवलंबून रहावं लागणार आहे.

दरम्यान, फरहान म्हणाला की, 'आम्ही श्रीलंका - इंग्लंड सामन्यात पाहिलं की चेंडू चांगला ग्रिप करत होता. इंग्लंड फिरकीविरूद्ध संघर्ष करतो. श्रीलंकेकडं एक किंवा दोन फिरकीपटू होते. आमच्याकडे पाच आहेत. त्यामुळं इंग्लंडला संपूर्ण २० षटके फिरकीचा सामना करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT