प्रातिनिधिक छायाचित्र.  
स्पोर्ट्स

Asian Champions Trophy : पाकिस्तान हॉकी संघाचा भारतात खेळण्यास नकार, तटस्थ ठिकाणाची मागणी

२७ ऑक्टोबरपासून मोहालीमध्ये आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Pakistan Hockey Asian Champions Trophy 2026

पाकिस्तान हॉकी संघाचा भारतात खेळण्यास नकार दिला आहे. आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन भारताबाहेर करावे किंवा त्यांना भारतासोबतचे सामने तटस्थ ठिकाणी खेळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पाकिस्तान हॉकीने आशियाई हॉकी फेडरेशनकडे (AHF) मागणी केली आहे. २७ ऑक्टोबरपासून मोहालीमध्ये आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.

पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जावेत

पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष मोहियुद्दीन अहमद वानी यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, फेडरेशनने आशियाई हॉकी फेडरेशनकडे विनंती केली आहे की, २०२६ ची पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या ठिकाणी हलवावी किंवा पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जावेत. दोन्ही देशांमधील सध्याचे संवेदनशील संबंध आणि पाकिस्तानचे खेळाडू व कर्मचारी यांच्यासाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

म्‍हणे, आमच्‍या खेळाडूंना अधिक अनुकूल वातावरण मिळेल

"पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सध्याची संवेदनशील द्विपक्षीय परिस्थिती आणि सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून आमच्या राष्ट्रीय खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि अनुकूल वातावरण मिळेल," असे निवेदनात नमूद करण्‍यात आले आहे.

हॉकीच्या जागतिक प्रसारासाठी पाकिस्तान पूर्णपणे कटिबद्ध

"आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि हॉकीच्या जागतिक प्रसारासाठी पाकिस्तान पूर्णपणे कटिबद्ध आहे. आम्ही भारतासह सर्व FIH सदस्य देशांविरुद्ध खेळण्यास तयार आहोत आणि खेळ राजकारणापासून वेगळे ठेवण्याच्या तत्त्वावर ठाम आहोत. आम्हाला ठाम विश्वास आहे की, पाकिस्तानचा अखंड आणि पूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तटस्थ ठिकाणाबाबतच्या आमच्या वाजवी प्रस्तावाचा आशियाई हॉकी फेडरेशन सकारात्मक विचार करेल," असे पाकिस्तान हॉकीच्या निवेदनात म्हटले आहे.

२७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान आशियाई हॉकी स्‍पर्धा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान जालंधर आणि मोहाली येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळले जातील, असे जाहीर केले आहे.

पाकिस्तानच्या खेळाडूंना रोखले जाणार नाही

भारताचे क्रीडा धोरण पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रीडा स्पर्धांना परवानगी देत ​​नाही. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू आणि त्यानंतरच्या वर्षी भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेली लष्करी कारवाई या घटनांनंतर ही भूमिका ठळकपणे समोर आली.त्याच वेळी, क्रीडा मंत्रालयाने ही भूमिका कायम ठेवली आहे की, ऑलिम्पिक चार्टरनुसार भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळण्याची परवानगी आहे. परिणामी, अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येण्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंना रोखले जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT