Pakistan Team Humiliation pudhari photo
स्पोर्ट्स

Pakistan Team Humiliation: पाकिस्तानी टीमचा घोर अपमान! हॉटेलचं बील न भरल्यामुळं खेळाडूंना रस्त्यावरच...

टीम आणि अधिकाऱ्यांनी फोर स्टार हॉटेल बुकिंग केलं होतं.

Anirudha Sankpal

Pakistan Team Hotel Booking: पाकिस्तानची जरभरात नेहमी फजिती होत असते. याची अनेक उदाहरणे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पाकिस्तान संघाचा किंवा त्यांच्या प्रशासनाचा वेंधळेपणा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता पाकिस्तानच्या हॉकी टीमसोबत एक लाजीरवाणी गोष्ट घडली आहे. ऑस्ट्रेलियातील कॅनबरामध्ये हॉटेलचे देणे नं भागवल्यामुळं त्यांचे बुकिंग रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळं खेळाडूंना रस्त्यावर भटकत रहावं लागलं.

खेळाडू रस्त्यावर

ही घटना FIH Pro League च्या दुसऱ्या फेरी दरम्यान झाली आहे. पाकिस्तानी संघ हॉबार्टमध्ये सामना खेळण्यासाठी पोहचला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीम आणि अधिकाऱ्यांनी फोर स्टार हॉटेल बुकिंग केलं होतं. त्यांना या हॉटेलचे भाडे पाकिस्तान हॉकी फेडरेशन आणि पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डानं केलं असल्यांचे सांगण्यात आलं. मात्र ज्यावेळी खेळाडू कॅनबरा इथं पोहचले. त्यावेळी त्यांना हॉटेल प्रशासनानं तुमचं कोणतंही बुकिंग नाहीये असं सांगितलं. तुमच्या बुकिंगचे कोणतेही पैसे आलेले नाहीत असंही प्रशासनानं सांगितलं.

एका रूममध्ये ३ खेळाडू

दरम्यान, संघाच्या प्रशिक्षक ताहिर जमा यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळ, अंतर आणि कथित पैशाची कमी यामुळं अनेक तास कोणताच तोडगा निघाला नाही. मोठ्या प्रवासानंतर खेळाडूंकडे विश्रांतीसाठी कोणतीच जागा नव्हती. त्यांच्या खाण्या-पिण्याची कोणतीच सोय नव्हती.

शेवटी मोठ्या प्रयत्नानंतर हॉटेलमध्ये त्यांना काही रूम्स मिळाल्या. रूम्स कमी असल्यामुळं एका रूममध्ये दोन ते तीन खळाडूंना थांबावं लागलं. पुढच्या दिवशी संघ थेट मैदानावर उतरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २ - ३ असा पराभव केला.

आर्थिक तंगीचा सामना

पाकिस्तान हॉकी टीम ऑस्ट्रेलिया, जर्मनी सारख्या संघांसमोर पिछाडीवर पडत आहे. आता प्रो लीगमध्ये पाकिस्तान संघानं आपले सर्व ६ सामने गमावले आहेत. मात्र कॅनबरामधील घटना ही खेळापेक्षा जास्त व्यवस्थेचे अपयश याच्यावर बोट ठवते.

पाकिस्तानी खेळाडूंना अपमानाचा सामना करण्याची ही काही पहिली वेळ नाही. अर्जेंटिनामधील प्रो लीगच्या पहिल्या फेरीत देखील खेळाडूंना दिवसाचा भत्ता वेळेत मिळत नव्हता. त्यामुळे परदेशात खेळाडूंना अर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता.

मॅनेजरही नाही

पाकिस्तानची हॉकी टीम यावेळी त्यांच्या नियमित मॅनेजरशिवाय ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली आहे. माजी ऑलिंपियन अंजूम सईद यांना त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर हटवण्यात आलं होतं. विमानात धुम्रपान आणि एअरपोर्ट सुरक्षा रक्षकासोबत कथित वाद घातल्यामुळं त्यांना हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

तसंच ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंना दिवसाचा भत्ता हा ११५ अमेरिकन डॉलर निश्चित करण्यात आला होता. मात्र फक्त भत्ता वाढून व्यवस्थेमधील त्रुटी झाकल्या जाऊ शकणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT