Pakistan Controversy| पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने रस्त्यावर राहण्याची वेळ!

Major Embarrassment for Pakistan लाहोरपासून प्रदीर्घ प्रवास करून आलेल्या खेळाडूंवर ओढवली नामुष्‍की
Pakistan Controversy| पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने रस्त्यावर राहण्याची वेळ!
Published on
Updated on

Major Embarrassment for Pakistan

कॅनबेरा : पाकिस्तानच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी नाचक्की झाली आहे. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे पोहोचलेल्या पाकिस्तान हॉकी संघाला हॉटेलचे बिल न भरल्यामुळे तासन्तास रस्त्यावर ताटकळत राहावे लागले. पाकिस्तान हॉकी महासंघाकडे (PHF) निधीची कमतरता असल्याने हॉटेलची बुकिंग रद्द करण्यात आली होती, ज्यामुळे खेळाडूंना हा मानहानीकारक प्रसंग सोसावा लागला.

प्रदीर्घ प्रवासानंतर खेळाडूंना विश्रांतीसाठी जागाच नव्‍हती

पाकिस्तानी संघ सध्या 'एफआयएच प्रो लीग'च्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना कॅनबेरामध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरवण्यात येणार होते. त्यांना सांगण्यात आले होते की, 'पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड' (PSB) आणि 'पीएचएफ'ने निवासाचे सर्व पैसे आगाऊ भरले आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात जेव्हा खेळाडू हॉटेलवर पोहोचले, तेव्हा तिथे कोणतीही बुकिंग नसल्याचे समोर आले.वेळेतील फरकामुळे मुख्य प्रशिक्षक ताहिर झमान यांना मायदेशातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधताना मोठ्या अडचणी आल्या. लाहोरहून प्रदीर्घ प्रवास करून आलेल्या खेळाडूंना विश्रांतीसाठी साधी जागाही उपलब्ध नव्हती.

Pakistan Controversy| पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने रस्त्यावर राहण्याची वेळ!
T20 WC India vs Pakistan | "आमचे विमान बुक...." : भारत-पाकिस्‍तान सामन्‍याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

दुसर्‍याच दिवशी ऑस्‍ट्रेलियाकडून स्‍वीकारावा लागला पराभव

एकाच खोलीत तीन खेळाडू कित्येक तास रस्त्यावर प्रतीक्षा केल्यानंतर हॉटेल प्रशासनाशी चर्चा करून काही खोल्या मिळवण्यात यश आले. मात्र, खोल्यांची संख्या कमी असल्याने एकाच खोलीत दोन ते तीन खेळाडूंना राहावे लागले. पुरेशी विश्रांती न मिळाल्याने दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला ३-२ ने पराभव स्वीकारावा लागला.विशेष म्हणजे हॉकी हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे आणि त्यांचा संघ प्रो लीगमध्ये ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसारख्या दिग्गज संघांविरुद्ध खेळत आहे.

Pakistan Controversy| पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने रस्त्यावर राहण्याची वेळ!
Pakistan Bangladesh T20 World Cup 2026: पाकिस्तानचा बांगलादेशसोबत 'डबल गेम'... बहिष्कार बहिष्कार खेळले अन् पलटी मारली

व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार

पाकिस्तान हॉकी संघासोबत सध्या कोणताही मॅनेजर नाही. माजी ऑलिंपियन अंजुम सईद यांना विमानात धूम्रपान करणे आणि सुरक्षा रक्षकांशी वाद घालणे या कारणास्तव पदावरून हटवण्यात आले आहे. व्यवस्थापनाच्या या गोंधळामुळे खेळाडूंना परदेशात स्थानिक पाकिस्तानी नागरिकांची मदत घ्यावी लागली. विशेष म्हणजे, यापूर्वी अर्जेंटिनामध्येही खेळाडूंना त्यांचा दैनंदिन भत्ता मिळाला नव्हता. पाकिस्तानने प्रो लीगमध्ये आतापर्यंत खेळलेले सर्व सहा सामने गमावले आहेत. खेळातील सुमार कामगिरी आणि प्रशासकीय अनागोंदी यामुळे पाकिस्तान हॉकी सध्या जागतिक स्तरावर टीकेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news