Pakistan Cricket Team New Coach pudhari
स्पोर्ट्स

Pakistan Cricket Team New Coach: सामन्यात 'जांभई' देणारा सर्फराज पाकिस्तानचा नवा कोच... U19 संघाच्या यशानंतर मिळालं प्रमोशन

Anirudha Sankpal

Pakistan Cricket Team New Coach: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेश सोबत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आपल्या १६ सदस्य असलेल्या संघाची घोषणा केली. ही कसोटी मालिका ८ मे पासून ढाका इथं सुरू होत आहे. पाकिस्तानच्या या कसोटी संघाचे नेतृत्व शान मसूद करणार आहे. तर अब्ल्लाह फझल, अमाद बट्ट, अझान अवैस आणन मोहम्मद गाझी घोरी या चार नव्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. मालिकेतील पहिला सामना हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असणार आहे. हा सामना शेर ए बांगला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

असा असेल पाकिस्तानचा बांगलादेश दौरा

पाकिस्तानचा संघ कराचीमध्ये सराव करणार आहे. हे सराव सत्र २७ एप्रिल पासून १ मे पर्यंत असणार आहे. त्यानंतर संघ २ मे रोजी बांगलादेशसाठी रवाना होईल. कसोटी संघातील खेळाडू सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहेत. ते एक एक करून सराव सत्रात सामील होतील. ज्या खेळाडूंचे संघ फायनलमध्ये पोहचलेत ते खेळाडू स्पर्धा संपल्यानंतर थेट बांगलादेशसाठी रवाना होतील.

सर्फराज अहमदला मिळाली बढती

पाकिस्तान क्रिकेट संघाने कसोटी संघासाठी कोचिंग स्टाफची देखील घोषणा केली आहे. माजी कसोटी कर्णधार सर्फराज अहमदला संघाचा मुख्य प्रशिक्षक नियुक्त केलं आहे.

सर्फराज अहमदने पाकिस्तानचे नेतृत्व करताना दोन आयसीसी स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. त्याने २००६ मध्ये १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्डकप आणि २०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती. तो पाकिस्तानच्या १९ वर्षाखालील संघाचा मेंटॉर आणि मॅनेजर असताना त्याने १९ वर्षाखालील संघाने आशिया कप जिंकला होता.

असाद अन् उमर गुलचीही नियुक्ती

सर्फराज अहमदसोबतच माजी कसोटीपटू असाद शफिक आणि उमर गुल हे फलंदाजी आणि गोलंदाजी कोच म्हणून काम पाहणार आहेत. असादने १४७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात ७७ कसोटी, ६० वनडे आणि १० टी २० सामन्यांचा समावेश आहे. त्याने एकूण ६,१८८ धावा केल्या आहेत. यात १२ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.

उमर गुलने २३७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात ४७ कसोटी, १३० वनडे सामने आणि ६० टी २० सामन्यांचा समावेश आहे. त्याने एकूण ४२७ विकेट्स घेतल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT