NZ vs IND 2nd Test pudhari
स्पोर्ट्स

NZ vs IND 2nd Test: टीम इंडिया पुन्हा 'थंड' पडली, सामन्यावरील पकड गमावली; किवींनी मारली द्विशतकी मजल, बुमराहची पाटी कोरीच

NZ vs IND 2nd Test: ग्लेन फिलिप्स टॉम ब्लंडेल यांनी पुन्हा एकदा झुंजार खेळी करत न्यूझीलंडला दिवस अखेर ५ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

Anirudha Sankpal

NZ vs IND 2nd Test: ख्राईस्टचर्चमध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटीची सुरूवात झाली असून आज कसोटीचा पहिला दिवस होता. नेहमीप्रमाणे भारताने पहिल्या काही सत्रात चांगली गोलंदाजी करत किवींना चांगलेच दमवले होते. चांगली सुरूवात करणाऱ्या न्यूझीलंडची अवस्था ४ बाद ११० धावा झाल्यावर टीम इंडिया किवींचा डाव लवकर गुंडाळणार असं वाटत होतं.

मात्र ग्लेन फिलिप्स टॉम ब्लंडेल यांनी पुन्हा एकदा झुंजार खेळी करत न्यूझीलंडला दिवस अखेर ५ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारून दिली. ब्लंडेल हा अर्धशतक (५३) तर फिलिप्स ३६ धावा करून नाबाद राहिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने निराशा केली. त्याला पहिल्या दिवशी एकही विकेट घेतला आली नाही.

न्यूझीलंडची चांगली सुरूवात

न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम आणि डेवॉन कॉन्वे यांनी चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली होती. मात्र लंचपूर्वी गुरनूर बरारने कॉन्वेला बाद केलं अन् किवींचा विकेट्स पडण्याचा सिलसिला सुरू झाला.

दुसरे सत्र भारताचे

न्यूझीलंडने दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला चांगली सुरूवात केली होती. लॅथमने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तो न्यूझीलंडकडून WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला होता. मात्र ५९ धावांवर असताना आकाश दीपने लॅथमला बाद केलं. त्यानंतर भारताने किवींना अजून धक्का देत सामन्यावर पकड निर्माण केली. ११० धावांवर भारताने न्यूझीलंडला तीन झटके दिले होते. गोलंदाजीत आदाशदीप, अंशुल कंबोज यांनी चांगला मारा केला.

न्यूझीलंडने डाव सावरला

मात्र यानंतर किवींचे दोन अनुभवी शिलेदार डॅरेल मिचेल आणि टॉम ब्लंडेल यांनी डाव सावरत किवींना दीडशतकी मजल मारून दिली. ही जोडी जमली असे वाटत असतानाच वॉशिंग्टन सुंदरने मिचेलला ३१ धावांवर बाद करत न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. आता सामन्यावर भारताची पकड मजबूत झाली आहे असे वाटत होते.

बुमराहची पाटी कोरी

मात्र सेट झालेल्या ब्लंडेल आणि चिवट फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या ग्लेन फिलिप्सने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. दिवसअखेर अजून पडझड होऊ न देता या दोघांनी किवींना २४६ धावांपर्यंत मजल मारून दिली. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी किवींच्या ५ बाद २४६ धावा झाल्या होत्या. विशेष म्हणजे पहिल्या दिवसाच्या खेळात भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने १९ षटके गोलंदाजी केली. मात्र त्याची विकेटची पाटी कोरीच राहिली. त्याने १.९० च्या सरासरीने धावा दिल्या. त्यात त्याने ४ षटके निर्धाव टाकली. मात्र त्याला विकेट मिळवता आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT