nz vs eng odi series new zealand beat england in 1st odi match
माउंट माउंगनुई : इंग्लंडचा संघ 3 बाद 5 वरुन 4 बाद 10, 5 बाद 33, 6 बाद 56 असा गडगडत असताना हॅरी ब्रूकने 135 धावांची आतषबाजी करत 35.2 षटकात सर्वबाद 223 धावांपर्यंत मजल मारुन दिली. मात्र, तरीही तो संघाला विजय मिळवून देण्यात मात्र असमर्थ ठरला. माऊंट माऊंगनुई येथे झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडवर 80 चेंडूंचा खेळ आणि 4 गडी बाकी राखत दमदार विजय मिळवला.
ब्रूक उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने न्यूझीलंडच्या प्रत्येक गोलंदाजीचा यशस्वीपणे सामना केला. तो बाद झाला तेव्हा त्याने 11 षटकारांसह 135 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडने 220 धावांचा आकडा पार केला. इंग्लंडच्या या कर्णधाराने दडपण झुगारुन खेळ साकारताना 101 चेंडूंमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम 135 धावांचे योगदान दिले. त्याला फलंदाजीतील या चमकदार कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
इंग्लंडने सर्वबाद 223 धावा केल्यानंतर न्यूझीलंडने 36.4 षटकात 6 बाद 224 धावांसह विजय संपादन केला. डॅरेल मिशेलने सर्वाधिक 78 तर ब्रेसवेलने 51 धावांचे योगदान दिले.
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) : 94 धावा : 141 संघाची धावसंख्या : 66.66 : विरुद्ध झिम्बाब्वे (2022)
टोनी यूरा (पीएनजी) : 151 धावा : 235 संघाची धावसंख्या : 64.25 धावांची टक्केवारी : विरुद्ध आयर्लंड (2018)
ॲरॉन जोन्स : 47 धावा : 74 संघाची धावसंख्या : 63.51 धावांची टक्केवारी : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (1990)
स्कॉट स्टायरिस (न्यूझीलंड) : 141 धावा : 225 संघाची धावसंख्या : 62.66 धावांची टक्केवारी : विरुद्ध श्रीलंका (2003)
डॅमिएन मार्टिन (ऑस्ट्रेलिया) : नाबाद 116 धावा : 191 संघाची धावसंख्या : 60.73 धावांची टक्केवारी : विरुद्ध न्यूझीलंड (2000)
हॅरी ब्रूक (इंग्लंड) : 135 धावा : 223 संघाची धावसंख्या : 60.53 धावांची टक्केवारी : विरुद्ध न्यूझीलंड (2025)
2 : पहिले 4 फलंदाज 10 किंवा त्याहून अधिक कमी धावात बाद झाले असताना एखाद्या संघाने वन डेत 200 हून अधिक धावा जमवण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी भारताने 1983 मध्ये झिम्बाब्बेविरुद्ध 8 बाद 266 धावा करत या यादीत अव्वलस्थान काबीज केलेले आहे.
3 : हॅरी ब्रूक हा पाचव्या क्रमांकावरील फलंदाज असला तरी प्रारंभीच्या पडझडीमुळे तो तिसऱ्याच षटकात फलंदाजीला उतरला. इंग्लंडची 3 बाद 5 अशी दैना उडाली असताना तो क्रीझवर आला होता.
57 : ल्यूक वूड व हॅरी ब्रूक यांची शेवटच्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी इंग्लंडतर्फे नवा उच्चांक प्रस्थापित करणारी ठरली.
223 : संघाचे 11 पैकी 8 फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले असताना 223 ही इंग्लंडची एकूण दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी 1984 मध्ये विंडीजने इंग्लंडविरुद्ध 9 बाद 272 धावा केल्या. त्यात रिचर्डसचा वाटा नाबाद 189 धावांचा होता.
इंग्लंड : 35.2 षटकात सर्वबाद 223 (हॅरी ब्रूक 101 चेंडूत 9 चौकार, 11 षटकारांसह 135, जेमी ओव्हर्टन 54 चेंडूत 46. फॉक्स 41 धावात 4 बळी, जेकब डफी 3/55, मॅट हेन्री 2/53).
न्यूझीलंड : 36.4 षटकात 6 बाद 224. (डॅरेल मिशेल 91 चेंडूत 78. मायकल ब्रेसवेल 51 चेंडूत 51. ब्रायडन कार्स 3/45).