

Gautam Gambhir On Harshit Rana
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ शनिवारी (दि. २५) सिडनीमध्ये भिडले. मालिकेतील हा अखेरचा सामना औपचारिक सामना होता कारण दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने निर्विवाद आपले वर्चस्व राखले होते. तिसर्या वन- डेमध्ये भारतीय संघाला सूर गवसला. गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताचा विजय सुकर झाला. या सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने ८.४ षटकांत ३९ धावा देत चार बळी घेतले. दुसर्या सामन्यातही त्याने चकमकदार फलंदाजी केली होती. तरीही याच्या निवडीवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच हर्षित राणाला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही फटकारल्याचेही वृत्त समोर आले आहे.
हर्षितच्या एकदिवसीय संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, त्याचा लहानपणीचा प्रशिक्षक श्रवण कुमार यांनी गंभीर आणि हर्षित यांच्यातील फोनवरील संभाषणाचा तपशील उघड केला आहे. सिडनीच्या सामन्यात तर अर्शदीप सिंगऐवजी हर्षितची निवड प्लेइंग इलेव्हनमध्ये करण्यात आली होती, ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते.हर्षितच्या निवडीवरील टीकेच्या पार्श्वभूमीवर, गंभीरने कथितरित्या या युवा वेगवान गोलंदाजाला स्पष्ट शब्दात ताकीद दिली "परफॉर्म कर, वरना बाहर बिठा दूंगा" [चांगला खेळ कर, नाहीतर तुला संघाबाहेर बसवेन].
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना श्रवण कुमार म्हणाले की, हर्षितचा मला फोन आला होता. त्याने सांगितले की, माझ्यासंघ निवडीवर जे सवाल उपस्थित करत आहेत त्यांचा आवाज मला माझ्या कामगिरीने बंद करायचा आहे. यावेळी मी फक्त म्हटले, 'स्वतःवर विश्वास ठेव. मला माहित आहे की, काही क्रिकेटपटू म्हणतात की तो गंभीरच्या जवळ आहे; प्रतिभा कशी हेरायची याचे गंभीरला अजूक जाण आहे. त्याने अनेक क्रिकेटपटूंना पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी त्यांच्या संघासाठी चमत्कार केले आहेत. गौतम गंभीरने हर्षिला स्पष्ट सांगितले होते की, संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी कर अन्यथा बाहेर बसवावे लागले. तुम्ही कोणीही असलात तरी गौतम गंभीर हा खेळाडूंना स्पष्ट संदेश देतो, असेही श्रवण कुमार यांनी स्पष्ट केले.
गौतम गंभीरने हर्षितच्या निवडीच्या निर्णयावर काहींनी टीका केली. यावर श्रवण कुमार म्हणाले की, प्रथम माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी हर्षितच्या प्रतिभेवर सवाल उपस्थित केले. निवृत्तीनंतर, क्रिकेटपटूंनी त्यांचे YouTube चॅनेल कमाईसाठी सुरू केले आहेत, परंतु कृपया नुकतेच सुरुवात केलेल्या कोणत्याही मुलाची तपासणी करू नका. त्यांना मार्गदर्शन करण्याचा, फटकारण्याचा अधिकार आहे, परंतु कृपया तुमच्या YouTube चॅनेलचे प्रेक्षक वाढावेत यासाठी काहीही बोलू नका," असेही श्रवण कुमार यांनी सांगितले.