Mumbai Indians Retained Players Pudhari
स्पोर्ट्स

Mumbai Indians Retained Players: डब्ल्यूपीएलच्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सचे धक्कातंत्र; ६ खेळाडूंना डच्चू, कर्णधार हरमनसह ११ खेळाडू कायम

WPL 2027 साठी मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरसह ११ खेळाडूंना रिटेन केले. सहा खेळाडूंना रिलीज करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महिला प्रिमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) आगामी हंगामासाठी दोन वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरसह ११ खेळाडूंना कायम (रिटेन) केले आहे. हरमनप्रीतसह अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नताली स्किव्हर ब्रंट, निकोला केरी, राहिला फिरदौस, एस. सजना, संस्कृती गुप्ता, शबनिम इस्माईल, वैष्णवी शर्मा यांच्यावर विश्वास ठेवला आहे.

फ्रँचायझीने आगामी लिलावापूर्वी ६ खेळाडूंना संघातून रिलीज केले. त्यात पूनम खेमनार, सायका इशाक, त्रिवेणी वसिष्ठ, क्रांती रेड्डी, इलिंगवर्थजी आणि कमलिनी यांचा समावेश आहे. डब्ल्यूपीएल २०२७ हंगामासाठीचा लिलाव आगामी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कोची येथे होणार आहे. महिला प्रिमियर लीग स्पर्धेचा पुढील हंगाम १४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२७ या काळात खेळवला जाणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाने महिला प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. मार्च २०२३ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून पहिली ट्रॉफी उंचावली.

त्यानंतर २०२५मधील हंगामात पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत दुसरे विजेतेपद आपल्या नावावर केले. त्यावेळीही मुंबईने पुन्हा दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले. मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी ल्यूक विलियम्स यांची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

रिलीज केलेले खेळाडू

  • पूनम खेमनार

  • सायका इशाक

  • त्रिवेणी वसिष्ठ

  • क्रांती रेड्डी

  • इलिंगवर्थ

  • कमलिनी

कायम केलेले खेळाडू

  • हरमनप्रीत कौर

  • अमनजोत कौर

  • हेली मॅथ्यूज

  • अमेलिया केर

  • नताली स्किव्हर ब्रंट

  • निकोला केरी

  • राहिला फिरदौस

  • एस. सजना

  • संस्कृती गुप्ता

  • शबनिम इस्माईल

  • वैष्णवी शर्मा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT