Mumbai Indian pudhari
स्पोर्ट्स

Mumbai Indian: मुंबईच्या 'सहाव्या' विजेतेपदाची स्क्रिप्ट होतेय तयार... GT विरूद्धचा विजय अन् २०१५ चा हंगाम; काय आहे कनेक्शन?

Anirudha Sankpal

Mumbai Indian IPL 2026 Winner: मुंबई इंडियन्स हंगामाची सुरूवात पराभवानं करते आणि नंतर जोरदार कमबॅक करून थेट विजेतेपदालाच गवसणी घालते. ही काही त्यांच्या एका हंगामाची कहानी नाही. मुंबई इंडियन्सचा हा डीएनएच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक हंगामात त्यांनी पहिले चार पाच सामने सलग गमावल्यानंतर बाऊन्स बॅक केला आहे. यंदाच्या हंगामात देखील ते अशाच प्रकारची कामगिरी करतील का अशी एक आशा निर्माण झाली आहे. ही आशा त्यांनी गुजरात टायटन्सला मात दिल्यानंतर पल्लवीत झाली आहे. तसे त्याला काही योगायोग देखील जोडले गेलेले आहेत.

मुंबईने पराभवाची मालिका केली खंडित

आयपीएल २०२६ च्या हंगामात सलग ४ सामने गमावल्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने पुन्हा लय मिळवत आपला रथ विजयीपथावर आणला. मुंबईने गुजरातचा ९९ धावांनी पराभव केला. त्यांचा हा विजय इतका मोठा होता की सर्वांचेच लक्ष मुंबईच्या विजयाकडे गेले. असा बाऊन्स बॅक मुंबईने काही पहिल्यांदा केलेला नाही.

यापूर्वी २०१३ च्या हंगामात मुंबईने आपल्या पहिल्या सहा सामन्यातील तीन सामने गमावले होते. आता त्यांचे आव्हान संपुष्टात आले असं वाटत असतानाच त्यांनी आपल्या पुढच्या १३ सामन्यांपैकी १० सामने जिंकून थेट विजेतेपदाला गवसणी घातली.

बाऊन्स बॅकची परंपरा

त्याच्या पुढच्याच हंगामात देखील त्यांची परिस्थिती अशीच होती. त्यांनी आपले पहिले पाच सामने गमावले होते. मात्र त्यानंतर जोरदार पुनरागमन करत मुंबईने १० पैकी ७ सामन्यात विजय मिळवला आणि इलिमिनेटरमध्ये प्रवेश केला.

२०१५ मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने सुरूवातीच्या टप्प्यात आपले ५ सामने गमावले होते. त्यानंतर त्यांनी १० पैकी ९ सामने जिंकून विजेतपद पटकावलं. २०१३ आणि २०१५ मध्ये मुंबईने अत्यंत कठिक परिस्थितून बाऊन्स बॅक करत विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यावेळी रोहित शर्मा संघाचा कर्णधार होता.

  • २०१३ : सहा पैकी तीन सामन्यात पराभव - पुढच्या १३ सामन्यात १० विजय - चॅम्पियन्स

  • २०१४ : पहिल्या पाच सामन्यात पराभव - १० पैकी ७ सामन्यात विजय - इलिमिनेटर

  • २०१५ : सहा पैकी पाच सामन्यात पराभव - १० पैकी ९ सामन्यात विजय - चॅम्पियन

  • २०२५ : पाच पैकी चार सामन्यात पराभव - पुढच्या ११ सामन्यात ८ विजय - क्वालिफायर

यंदाच्या हंगामाची स्क्रिप्ट होतेय तयार?

२०२५ मध्ये देखील अशीच स्थिती होती. मुंबईने ५ पैकी ४ सामने गमावले होते. मुंबई इंडियन्स त्यावेळी प्रचंड दबावात होती. मात्र पुढच्या ११ सामन्यातील ८ सामने जिंकून मुंबईने क्वालिफायर २ पर्यंत मजल मारली. आता पुन्हा एकदा मुंबईसाठी आयपीएल हंगामाची खराब सुरूवात झाली आहे. मात्र मुंबईला अजूनही क्वालिफायर गाठण्याची संधी आहे. त्यांना फक्त उरलेल्या ११ सामन्यांपैकी ८ सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT