मुंबई इंडियन्स संघ संग्रहीत छायाचित्र
स्पोर्ट्स

IPL 2025 मध्ये Mumbai Indians चे ‘चॅम्पियन’ होणे निश्चित... तयार होत आहे ‘हा’ रंजक योगायोग

Mumbai Indiansने सुरुवातीच्या 5 सामन्यांपैकी फक्त एकात विजय मिळवला होता.

रणजित गायकवाड

मुंबई : आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स (एमआय)ने खराब सुरुवातीनंतर जबरदस्त पुनरागमन केले आहे. एमआयने सुरुवातीच्या पाच सामन्यांपैकी फक्त एकात विजय मिळवला होता. परंतु हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली या संघाने आता सलग चार सामने जिंकले आहेत. पाच वेळा चॅम्पियन असलेल्या एमआयच्या खात्यात 10 गुण झाले आहेत.

मुंबईने 9 सामन्यांमध्ये 5 विजय मिळवले असून ते प्लेऑफच्या शर्यतीत मजबूतपणे सामील झाले आहेत. आता मुंबई आपल्या पुढील सामन्यात आज (27 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्याशी सामना करेल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल.

...तर मुंबई इंडियन्स विजेतेपद जिंकणार हे निश्चित?

तसं पाहिलं तर, 2020 नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या एका हंगामात सलग 4 सामने जिंकले आहेत. 2020 मध्ये जेव्हा मुंबई इंडियन्सने अशी कामगिरी केली होती तेव्हा ते पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्यात यशस्वी झाले होते. यंदा 2020च्या इतिहसाची पुनरवृत्ती झाली आहे. हा मनोरंजक योगायोग यंदा कितपत खरा ठरतो हे येणा-या सामन्यांतून स्पष्ट होईल.

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्यानंतर सर्वाधिक आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके)चा क्रमांक लागतो. सीएसके आणि एमआय यांच्यात बरोबरी आहे. पहिल्या दोन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स लीग ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली होती. मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा 2010 मध्ये आपली छाप पाडली, तेव्हा सचिन तेंडुलकरच्या कर्णधारपदाखाली एमआयचा संघ उपविजेता ठरला होता.

त्यानंतर 2013 च्या हंगामात रिकी पॉंटिंगच्या जागी रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व स्वीकारले. त्या हंगामात हिटमॅनच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने विजेतेपद मिळवून सचिन तेंडुलकरला अविस्मरणीय निरोप दिला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्येही चॅम्पियन होण्यात यशस्वी ठरली.

IPL मधील MI च्या कामगिरीचा आढावा

  • 2008 - पाचव्या स्थानावर

  • 2009 - सातव्या स्थानावर

  • 2010 - उपविजेता

  • 2011 - प्लेऑफसाठी पात्र, तिसऱ्या स्थानावर

  • 2012 - प्लेऑफसाठी पात्र, चौथ्या स्थानावर

  • 2013 - आयपीएल चॅम्पियन

  • 2014 - प्लेऑफसाठी पात्र, चौथ्या स्थानावर

  • 2015 - आयपीएल चॅम्पियन

  • 2016 - पाचव्या स्थानावर

  • 2017 - आयपीएल चॅम्पियन

  • 2018 - पाचव्या स्थानावर

  • 2019 - आयपीएल चॅम्पियन

  • 2020 - आयपीएल चॅम्पियन

  • 2021 - पाचव्या स्थानावर

  • 2022 - दहाव्या स्थानावर

  • 2023 - प्लेऑफसाठी पात्र, चौथ्या स्थानावर

  • 2024 - दहाव्या स्थानावर

IPL 2025 मधील मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने

  • विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 27 एप्रिल, दुपारी 3:30 वाजता, मुंबई

  • विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 मे, सायंकाळी 7:30 वाजता, जयपूर

  • विरुद्ध गुजरात टायटन्स, 6 मे, सायंकाळी 7:30 वाजता, मुंबई

  • विरुद्ध पंजाब किंग्स, 11 मे, दुपारी 3:30 वाजता, धर्मशाला

  • विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 15 मे, सायंकाळी 7:30 वाजता, मुंबई

मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा, रयान रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सेंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, अश्विनी कुमार, राज अंगद बावा, रॉबिन मिंज, रीस टॉप्ली, मुजीब उर रहमान, कृष्णन श्रीजीत, अर्जुन तेंडुलकर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथुर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT