MS Dhoni 7 Number pudhari
स्पोर्ट्स

MS Dhoni 7 Number: आयपीएलपूर्वी महेंद्रसिंह धोनी सोडणार नंबर ७ ची साथ... खास दोस्ताचा नंबर करणार धारण?

Anirudha Sankpal

MS Dhoni 7 Number: आयपीएल २०२६ चा हंगाम हा चेन्नईचा थला अर्थात महेंद्रसिंह धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपला जर्सी क्रमांक बदलण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा खुद्द धोनीने केल्यामळं क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. अनेक वर्षापासून महेंद्रसिंह धोनी ७ क्रमांक वापरत होता. धोनी आणि क्रमांक ७ असं समीकरणच झालं होतं. मात्र आता तो ८ क्रमांक धारण करण्याची शक्यता आहे. मात्र ही बदललेली जर्सी चेन्नई सुपर किंग्जची यलो जर्सी नाहीये.

क्रिप्टिक पोस्ट

धोनीने सोशल मीडियावर एक गुढ पोस्ट केली आहे. त्यात 'काही नंबर तुमच्या सोबत राहतात... मात्र आत मी ८ क्रमांकावर स्विच होत आहे. लवकरच याबाबत तुम्हाला माहिती मिळेल.'

या सोशल मीडिया पोस्टमुळं त्याचे चाहते अन् संपूर्ण क्रिकेट जगत बुचकळ्यात पडलं आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा एक प्रमोशनल स्टंट आहे की यामागे काही भावनिक आणि स्ट्रेटेजिक मुव्ह आहे याबाबत मात्र संभ्रम आहे.

निर्णय जडेजाशी निगडीत?

एका थेअरीनुसार धोनीचा हा निर्णय रविंद्र जडेजाशी निगडीत असल्याचं सांगण्यात येत आहे. रविंद्र जडेजा हा यापूर्वी ८ नंबरची जर्सी घालत होता. मात्र आता तो राजस्थान रॉयल्सचा भाग झाला आहे. त्यामुळं हा क्रमांक आता रिकामा झाला आहे. अशा परिस्थितीत धोनी हा नंबर धारण करू शकतो. याद्वारे तो एक प्रकारे ट्रिब्युट देत आहे असा अंदाज काहीजण लावत आहेत. याची अधिकृत पुष्टी अजून झालेली नाही.

काही जाणकारांच्या मते ही एक ब्रँडिंग आणि मार्केटिंग मूव्ह मानली जात आहे. आयपीएलसारख्या मोठ्या व्यासपीठावर जर्सी नंबर बदलण्यानं चाहत्यांचा स्पर्धेतील रस अजून वाढेल तसेच संघाच्या मर्चेंडाईज सेलला देखील बूस्ट मिळेल.

सीएसकेची खास स्ट्रॅटजी

चेन्नई सुपर किंग्ज येणाऱ्या हंगामासाठी काही स्ट्रॅटेजीवर काम करत असेल.त्यात आपल्या वरिष्ठ खेळाडूंची भूमिका आणि ओळख नव्यानं सादर करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सध्याच्या घडीला तरी धोनी किंवा सीएसकेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र धोनीने ही चाल विचारपूर्वक खेळली आहे. यामागे नक्कीच कोणतं तरी मोठं कारण असणार आहे. याचा खुलासा लवकरच होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयने ७ क्रमांक केला होता रिटायर

बीसीसीआने महेंद्रसिंह धोनीचा जर्सी क्रमांक ७ हा २०२३ मध्येच रिटायर करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी २०१७ मध्ये देखील सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक १० देखील रिटायर केला होता. धोनीचा जन्म हा ७ जुलै १९८१ मध्ये झाला होता. त्यानं त्यांच्या जन्म तारखेवरून हा क्रमांक धारण केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT