MS Dhoni file photo
स्पोर्ट्स

MS Dhoni: "मी ६० वर्षांपर्यंत खेळू शकतो!"; निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीने स्वत:च सांगितलं; पाहा Video

IPL 2026: वयाच्या ४४ व्या वर्षीही धोनीचा उत्साह दांडगा असून, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना मिश्किल उत्तर देत चाहत्यांची मने जिंकली.

मोहन कारंडे

MS Dhoni IPL 2026

चेन्नई: IPL च्या १९ व्या हंगामाचे बिगुल वाजण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचा 'थला' म्हणजेच महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वयाच्या ४४ व्या वर्षीही धोनीचा उत्साह दांडगा असून, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना मिश्किल उत्तर देत चाहत्यांची मने जिंकली. "मी ६० वर्षांपर्यंत आयपीएल खेळू शकतो," असे धोनीने म्हटले आहे.

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रविवारी सीएसकेच्या एका खास फॅन इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दाक्षिणात्य अभिनेता शिवकार्तिकेयन याने धोनीला गमतीत विनंती केली की, "तू निवृत्तीच्या चर्चांकडे दुर्लक्ष कर आणि जास्तीत जास्त काळ क्रिकेट खेळत राहा." त्यावर हसत हसत धोनी म्हणाला, "हे कठीण आहे... पण मी नक्कीच प्रयत्न करू शकतो!" धोनीचे हे उत्तर ऐकताच संपूर्ण चेपॉक स्टेडियम 'धोनी-धोनी'च्या जयघोषाने दुमदुमून गेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

धोनीची आयपीएलमधील यशस्वी कारकीर्द:

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू आणि कर्णधार म्हणून धोनीकडे पाहिले जाते. त्याची आकडेवारी याची साक्ष देते:

सामने: २७८

धावा: ५४३९

जेतेपदे: ५ वेळा चेन्नईला चॅम्पियन बनवले.

धोनी आता आयपीएल २०२६ मध्ये आपला १९ वा हंगाम खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२४ मध्ये त्याने नेतृत्वाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली होती, तरीही संघातील त्याचे स्थान अढळ आहे.

IPL २०२६ शेवटचा हंगाम ठरणार?

धोनीच्या भविष्याबाबत क्रीडाविश्वात सतत चर्चा सुरू असतात. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे की, धोनी २०२६ च्या पूर्ण हंगामात खेळणार आहे, मात्र त्याची भूमिका काहीशी वेगळी असू शकते. गेल्या काही हंगामांपासून धोनीच्या भूमिकेत स्पष्ट बदल दिसले आहेत. तो आता कर्णधार नाही. 'फिनिशर' म्हणून तो फलंदाजीसाठी खूप खालच्या क्रमांकावर येतो. 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे त्याचा शारीरिक ताण कमी झाला आहे.

नव्या जोमाने पुनरागमन करण्याचे आव्हान

२०२५ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक झाली होती आणि संघ गुणतालिकेत तळाला राहिला होता. यंदा संघात संजू सॅमसनसारख्या नव्या दमाच्या खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्यामुळे यष्टिरक्षणाची जबाबदारी वाटून घेतली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत धोनीचा अनुभव संघाला पुन्हा उभारी देण्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT